ऐन पावसाळ्यात वारणेचे पात्र कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:15+5:302021-07-16T04:18:15+5:30
दरवर्षी जून, जुलै महिन्यांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असतो. जुलै महिन्याच्या या दिवसांत वारणा नदीस पूर येतो. यावर्षी ...
दरवर्षी जून, जुलै महिन्यांत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असतो. जुलै महिन्याच्या या दिवसांत वारणा नदीस पूर येतो. यावर्षी मात्र जुलै महिना निम्मा उलटून गेला तरी म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे बारमाही तुडुंब भरून वाहणाऱ्या वारणा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले असल्याचे चित्र आहे.
सध्या धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू असल्याने धरणात गुरुवारी सकाळी २२.३६ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून, धरण ६५ टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासांत धरण क्षेत्रात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणाच्या पायथ्या गेटमधून सध्या ११०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.
१५ शित्तूर वारुण वारणा नदी
फोटो :
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरामध्ये ऐन पावसाळ्यात वारणेचे पात्र असे कोरडे पडले आहे. (छाया : सतीश नांगरे)