तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:16+5:302021-06-26T04:17:16+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ...

Raise awareness about the side effects of tobacco products | तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करा

तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागृती करा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी शुक्रवारी दिल्या.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय सभेत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत हेते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा समन्वयक चारुशीला, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

गलांडे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला, थुंकण्यास व धुम्रपान करण्याला कायद्याने मनाई आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्हा तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी.

डॉ. प्रल्हाद देवकर यांनी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. समिती सदस्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सूचना केल्या.

-

Web Title: Raise awareness about the side effects of tobacco products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.