स्वच्छता मोहिमेमध्ये आठ टन कचरा उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:52 AM2020-02-10T11:52:24+5:302020-02-10T11:55:01+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये महास्वच्छता अभियानामध्ये रविवारी आठ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.
कोल्हापूर : शहरामध्ये महास्वच्छता अभियानामध्ये रविवारी आठ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.
मोहिमेचा हा एकेचाळिसावा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विवेकानंद कॉलेज, राजाराम महाविद्यालयाचे २०० पेक्षा जास्त एन.सी.सी.चे विद्यार्थी सहभागी झाले होते. याचबरोबर वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.
यावेळी नगरसेविका गीता गुरव, रिया गुरव, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर भोगम, स्वच्छतादूत अमित देशपांडे, शाखा अभियंता आर.के. पाटील, महाराष्ट्र आर्टिलरी बॅटरीचे कमांडिंग आॅफिसर कर्नल संजीव सरनाईक, सुभेदार मेजर मुकेश कुमार, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, राजाराम विद्यालयाचे एन.सी.सी. आॅफिसर लेफ्टनंट डॉ. विश्वनाथ बिटे, महावीर कॉलेजचे एन.सी.सी.चे आॅफिसर लेफ्टनंट उमेश वांगदरे, निवृत्त पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेडे उपस्थित होते.
शासकीय कार्यालये प्लास्टिकमुक्त करणार : आयुक्त डॉ. कलशेट्टी
विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वाईट प्रवृत्तीचे प्रबोधन करून युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोल्हापूर शहर १ मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त करण्याचा मानस आहे. यासाठी शहरातील सर्व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये ही प्लास्टिकमुक्त करणार आहे.
शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक यांची एकत्रितपणे बैठक आयोजित करून त्यांच्यात प्लास्टिकबाबत जनजागृती करणार आहे. तसेच शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी मानवी साखळीद्वारे प्लास्टिकबंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पाण्याच्या बचतीबाबत जनजागृतीचे फलक हातात घेऊन प्रबोधन करणार आहे.
स्वच्छ केलेला परिसर
पंचगंगा नदीघाट, रिलायन्स मॉलच्या पिछाडीस, हुतात्मा पार्क, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप व माळकर तिकटी ते छत्रपती शिवाजी मार्केट, टेंबलाईवाडी उड्डाणपूल ते लोणार वसाहत मेन रोड, कोटीतीर्थ तलाव, लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर परिसर तसेच कळंबा तलाव.
महापालिकेची यंत्रणा
४ जेसीबी, ७ डंपर, ६ आरसी गाड्या.
मोहिमेची वैशिष्ट्ये
- पंचगंगा नदीघाट येथे प्लास्टिकबंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण, पाण्याची बचत यांबाबत जनजागृती फलक हातात घेऊन जनजागृती.
- एन.सी.सी. विद्यार्थ्यांच्या वतीने शहरातील सर्व पुतळ्यांची स्वच्छता.
- बालचमूंसह ज्येष्ठांचा सहभाग.