ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावांत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:38+5:302020-12-29T04:22:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ताकदीने उतरून गावागावांत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. ...

Raise the NCP flag in the villages through Gram Panchayats | ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावांत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावांत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ताकदीने उतरून गावागावांत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

ग्रामपंचायत निवडणूक व विविध सेलच्या कार्यकारिणीचा सोमवारी आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ए. वाय. पाटील म्हणाले, स्थानिक विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीमधील सत्ता महत्त्वाची असते. पक्ष तळागाळापर्यंत बळकट करण्यासाठी पक्षाचे जास्तीत जास्त सरपंच, उपसरपंच व सदस्य झाले पाहिजेत. स्थानिक पातळीवर सोयीनुसार काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची आघाडी करा, मात्र कोणत्याही परिस्थितीत गावागावांत पक्षाचा झेंडा फडकवला पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ सेल असून, त्याची कार्यकारिणी पूर्ण करण्याच्या सूचना प्रदेश राष्ट्रवादीकडून आल्या आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, कार्यकारिणी करण्यासाठी तीन बैठक घेऊन सूचना केल्या, तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. छत्रपती शिवरायांचे मावळे स्वराज्यासाठी राबायचे, स्वार्थासाठी नाही, त्याप्रमाणे काम करा.

जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, डी. बी. पिष्टे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष राेहित पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, सविता सालपे, कृष्णात पुजारी, शिवाजी देसाई, संभाजी पाटील, पंडितराव केणे, नेताजी पाटील, आदी उपस्थित होते.

...तर करेक्ट कार्यक्रम हाेईल

सत्तेची सूज आली म्हणून पक्षाचे काम केले नाही तरी चालते, या आविर्भावात कोणी राहू नये. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कडक शिस्तीचे आहे. तुम्ही काय करता, याचा लेखाजोखा त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने योग्य वेळी ते करेक्ट कार्यक्रम करतील, असा इशारा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी दिला.

फोटो ओळी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रोहित पाटील, अनिल साळोखे, भय्या माने, आदी उपस्थित होते. (फोटो-२८१२२०२०-कोल - एनसीपी) (छाया - नसीर अत्तार)

Web Title: Raise the NCP flag in the villages through Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.