महास्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:00+5:302021-02-08T04:21:00+5:30

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. हा मोहिमेचा ९३ वा रविवार ...

Raise a ton of garbage in the Mahasvachchata Abhiyan | महास्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव

महास्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव

Next

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. हा मोहिमेचा ९३ वा रविवार होता. या अभियानामध्ये महापालिकेसह सामाजिक संघटनांचा सहभाग होता. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.

सायबर चौक ते केएसबीपी गार्डन चौक, सीपीआर चौक ते तोरस्कर चौक, पंचगंगा घाट, स्मशानभूमी संपूर्ण परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ चौक, ताराराणी चौक ते शिरोली जकात नाका, डीएसपी ऑफिस ते लाईन बझार मेनरोड येथे स्वच्छता करण्यात आली. यावेळी स्वरा फाउंडेशनच्यावतीने पंचगंगा घाट परिसर येथे स्वच्छता केली.

आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, प्रमोद माजगावकर, पियुष हुलस्वार, डॉ. अविनाश शिंदे, आयुष शिंदे, फैजान देसाई, मुकुंद कांबळे, शेखर वडणगेकर आदी उपस्थित होते.

चौकट

महापालिकेची यंत्रणा

तीन जेसीबी, सहा डंपर, सहा आरसी गाडया, दोन ट्रॅक्टर ट्रॉली, महापालिकेचे १५० कर्मचारी

फोटो : ०७०२२०२१ कोल केएमसी स्वच्छता न्यूज एक

ओळी : महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबवली.

Web Title: Raise a ton of garbage in the Mahasvachchata Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.