सोशल डिस्टंन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 01:36 PM2020-05-11T13:36:40+5:302020-05-11T13:38:27+5:30

कोल्हापूर : ह्यकोव्हीड १९ह्ण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. याअंतर्गत रविवारी शहरातील नाले ...

Raising three tons of garbage in the cleaning campaign by keeping social distance | सोशल डिस्टंन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा उठाव

सोशल डिस्टंन्स ठेवून स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा उठाव

googlenewsNext


कोल्हापूर : ह्यकोव्हीड १९ह्ण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. याअंतर्गत रविवारी शहरातील नाले स्वच्छता व औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली. तीन टन कचरा गोळा करण्यात आला. मोहिमेचा ५४ वा रविवार असून या अभियानामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंन्स ठेवून स्वच्छता सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली.

के.एम.टी बुध्दगार्डन, दुधाळी मैदान, कपिलतीर्थ मार्केट, कनाननगर, जयंती पंपिंग स्टेशन, पंचगंगा घाट, शिंगोशी मार्केट याठिकाणची स्वच्छता केली. ४ जेसीबी, ६ डंपर, ६ आरसी गाडीच्या साहाय्याने मोहीम राबविली. तसेच महापालिकेच्या १२० स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Raising three tons of garbage in the cleaning campaign by keeping social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.