‘अंनिस’ जिल्हाध्यक्षपदी राजा शिरगुप्पे, कार्याध्यक्षपदी डॉ. अरुण शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:54+5:302021-07-12T04:16:54+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या जिल्हाध्यक्षपदी राजा शिरगुप्पे, तर कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. अरुण शिंदे यांची निवड ...
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या जिल्हाध्यक्षपदी राजा शिरगुप्पे, तर कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. अरुण शिंदे यांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत निवडींची घोषणा करण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती आणि राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे हे उपस्थित होते.
अन्य निवडींत जिल्हा प्रधान सचिवपदी हर्षल जाधव (राधानगरी), रणजित कांबळे (भुदरगड), दिलीप कांबळे (करवीर) यांचा समावेश आहे. निवडीनंतर लगेच नव्या कार्यकारिणीने त्यागाचे प्रतीक असलेल्या बकरी ईदचे औचित्य साधून २१ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांना आवाहनही केले.
अन्य कार्यकारिणी अशी : विविध उपक्रम विभाग कार्यवाहपदी आफताब जमादार, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण विभाग कार्यवाहपदी शशी सुधीर कुंभार (शिरोळ), बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाहपदी संदीप कांबळे (शाहूवाडी), महिला सहभाग विभाग कार्यवाहपदी मुक्ता निशांत (करवीर) आणि गीता पोतदार (आजरा), युवा सहभाग विभाग कार्यवाहपदी गौतम कांबळे (कागल), प्रशिक्षण विभाग कार्यवाहपदी प्रा. मनोहर दिवटे (चंदगड), जातिअंत विभाग कार्यवाहपदी निशांत शिंदे (करवीर), सोशल मीडिया विभाग कार्यवाहपदी भास्कर सुतार, (गडहिंग्लज), मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग कार्यवाहपदी तुषार चोपडे (पन्हाळा) कायदेविषयक सल्लागारपदी ॲड. रविराज बिरजे (करवीर).
चौकट
प्रत्येक तालुक्यात शाखा स्थापन होणार
समाजात वाढती आधुनिक बुवाबाजी आणि अंधश्रद्धांचे विविध प्रकार पाहता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटनात्मक कामाची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शाखा स्थापन करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक सक्रियतेने करण्याचा निर्धार करण्यात आला.
फोटो: ११०७२०२१-कोल-राजा शिरगुप्पे अंनिस निवड
फोटो : ११०७२०२१-कोल-अरुण शिंदे अंनिस निवड