राजाराम कारखाना निवडणूक: सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर, महादेवराव महाडिकांनी नावे घोषित करताच समर्थकांचा जल्लोष

By विश्वास पाटील | Published: April 12, 2023 02:41 PM2023-04-12T14:41:13+5:302023-04-12T14:41:44+5:30

महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला

Rajaram Factory Election: Ruling Alliance Candidates Announced, Supporters Cheer As Mahadevrao Mahadika Announces Names | राजाराम कारखाना निवडणूक: सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर, महादेवराव महाडिकांनी नावे घोषित करताच समर्थकांचा जल्लोष

राजाराम कारखाना निवडणूक: सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर, महादेवराव महाडिकांनी नावे घोषित करताच समर्थकांचा जल्लोष

googlenewsNext

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उमेदवारांची नावे घोषित करताच उपस्थित समर्थकांनी जल्लोष केला. 

यावेळी बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. गेली अठ्ठावीस वर्षे कारखाना ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्या हाती सोपवला, त्याच विश्वासाने यंदाही कारखान्याचे सुज्ञ सभासद आम्हाला सेवेची संधी देतील. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी राजाराम कारखाना त्यांना बळकावता येणार नाही. असे उद्गार महाडिक यांनी काढले. 

सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी बोलताना सर्वसमावेशक उमेदवारांचे तगडे पॅनेल आम्ही जाहीर केले असून, विजयाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले तसेच सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

उमेदवारांची नावे अशी

उत्पादक गट क्रमांक १ 
1) विजय वसंत भोसले 
2) संजय बाळगोंडा मगदूम 

उत्पादक गट क्रमांक २ 
1) शिवाजी रामा पाटील 
2) सर्जेराव बाबुराव भंडारे 
3) अमल महादेवराव महाडिक 

उत्पादक गट क्रमांक ३
 1) विलास यशवंत जाधव 
2) डॉ.मारुती भाऊसो किडगावकर
3) सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)

 उत्पादक गट क्रमांक ४ 
1) तानाजी कृष्णात पाटील.
2) दिलीपराव भगवान पाटील 3)मीनाक्षी भास्कर पाटील

 उत्पादक गट क्रमांक ५
1)दिलीप यशवंत उलपे
2)नारायण बाळकृष्ण चव्हाण 

उत्पादक गट क्रमांक ६
 1) गोविंद दादू चौगले 
2) विश्वास सदाशिव बिडकर

महिला राखीव गटातून
 1) कल्पना भगवानराव पाटील
2)वैष्णवी राजेश नाईक

 इतर मागास प्रतिनिधी गटातून 
1)संतोष बाबुराव पाटील

 अनुसूचित जाती जमाती गटातून
 1) नंदकुमार बाबुराव भोपळे

 भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून
1) सुरेश देवाप्पा तानगे 

संस्था गटातून
1) महादेवराव रामचंद्र महाडिक 

Web Title: Rajaram Factory Election: Ruling Alliance Candidates Announced, Supporters Cheer As Mahadevrao Mahadika Announces Names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.