'राजाराम' बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:34 AM2020-06-02T10:34:55+5:302020-06-02T10:38:24+5:30
राजाराम बंधाऱ्याला पुण्याच्या पाण्याचा धोका होऊ नये म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढण्यात आल्या. या काढलेल्या प्लेटा पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये बसवण्यात येणार आहेत. बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्याने बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाण्याची उंची आहे.सतरा फुटाला बंधारा पावसाळ्यात पूर्णपणे पाण्याखाली जातो.
कसबा बावडा: राजाराम बंधाऱ्याला पुण्याच्या पाण्याचा धोका होऊ नये म्हणून पावसाळ्याच्या तोंडावर बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढण्यात आल्या. या काढलेल्या प्लेटा पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबरमध्ये बसवण्यात येणार आहेत. बंधाऱ्याच्या प्लेटा काढल्याने बंधाऱ्याजवळ ९ फूट इतकी पाण्याची उंची आहे.सतरा फुटाला बंधारा पावसाळ्यात पूर्णपणे पाण्याखाली जातो.
जूनच्या सुरुवातीला दोन-चार जोरदार पाऊस झाले की, राजाराम बंधारा लगेच पाण्याखाली जातो. एकदा बंधारा पाण्याखाली गेल्यावर बंधाऱ्याच्या मोरीतील लोखंडी प्लेटा काढता येत नाहीत. त्यामुळे बंधाऱ्याला धोका पोचू शकतो. त्यामुळे एक जून च्या दरम्यान पाऊस पडू दे अथवा न पडू दे प्लेटा काढून टाकल्या जातात.
यंदा पावसाला लवकरच सुरुवात होणार असल्याने पाटबंधारे विभागाने प्लेटा काढण्याचे काम हाती घेतले आहे. अद्याप काही मोरीच्या तळातील प्लेटा काढावयाच्या आहेत. येत्या आठवडाभरात हे काम संपेल. प्लेटा काढल्याने बंधाऱ्याची पाणीपातळी हळूहळू कमी होत चालली आहे.