राजारामपुरीत वृद्धेच्या हातातील पिशवी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:40+5:302021-03-20T04:21:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजारामपुरीतील एस. टी. काॅलनीत गुरुवारी (दि. १८) सायंकाळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील पिशवी ...

In Rajarampur, the old man's hand bag was extended | राजारामपुरीत वृद्धेच्या हातातील पिशवी लांबविली

राजारामपुरीत वृद्धेच्या हातातील पिशवी लांबविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजारामपुरीतील एस. टी. काॅलनीत गुरुवारी (दि. १८) सायंकाळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील पिशवी हिसडा मारून लांबविली. त्यात मोबाईलसह पुस्तके होती. याबाबत स्मिता श्रीकृष्ण भावे (वय ६९, एस.टी. काॅलनी, राजारामपुरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

फिर्यादी या गुरुवारी (दि. १८) सायंकाळी २२ हजार किमतीचा मोबाईल फोन व ग्रंथालयाची दोन पुस्तके पिशवीतून घेऊन एस.टी. काॅलनीतील अंतर्गत रस्त्यावरून चालत जात होत्या. त्या दरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अचानकपणे त्यांच्या हाताला हिसडा मारून पिशवी लांबविली. या चोरीचा तपास ठाणे अंमलदार शिंदे करीत आहेत.

मारामारीप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

कोल्हापूर : राजेंद्रनगर व शाहूनगर परिसरांत घरात घुसून मारहाण व धमकाविल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १८) परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुलास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद का दिली, याचा जाब विचारत घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केल्याबद्दल सुनीता संजय साजणीकर (वय ४७, रा. राजेंद्रनगर, जयभवानी क्रीडामंडळलगत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश सुरेश साजणीकर (२७), सागर विनायक साजणीकर (२८), गजानन अशोक साजणीकर (२८, रा. राजारामपुरी) या तिघा संशयितांवर गुन्हा नोंद केला; तर अशोक गणपत साजणीकर (५२, रा. शाहूनगर, राजारामपुरी) यांनी अजय संजय साजणीकर (२५, रा. राजेंद्रनगर) याच्यावर धमकावणे, काठीने मारहाण करणे याबद्दल परस्परविरोधी तक्रार नोंदविली. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे नोंदविले असून, ठाणे अंमलदार आवडे तपास करीत आहेत.

लक्ष्मीपुरीत महिलेस मारहाण

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील सर्वसाक्षी गणेश मंदिराशेजारी भाजी मंडईच्या परिसरात चौघाजणांनी घरगुती कारणावरून महिलेस मारहाण केली. याबाबतची फिर्याद शैला भारत बिरांजे (वय ५५, रा. ब्रह्मपुरी) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली. त्यानुसार नीलम सूरज बिरांजे, शशिकला चंद्रकांत कांबळे (रा. राजेंद्रनगर), ठाकूर ऊर्फ बाळू भोसले (राजारामपुरी सहावी गल्ली), स्वप्निल सोनुले (रा. मणेरमळा, उचगाव) या संशयितांवर गुन्हा नोंद झाला.

फिर्यादी या नातवंडासोबत ब्रह्मपुरी येथे राहतात. बुधवारी (दि. १७) रात्री त्या लक्ष्मीपुरीतील सर्वसाक्षी गणेश मंदिराजवळ आल्या असता त्यांना सून नीलम, सुनेची आई शशिकला व सुनेचा मामा ठाकूर ऊर्फ बाळू भोसले, मावसभाऊ सोनुले यांनी फिर्यादीला मुले कुठे आहेत असे विचारून प्रथम शिवीगाळ केली. त्यानंतर ठाकूर याने फिर्यादीच्या हातावर काठीने मारहाण करीत त्यांना जखमी केले. या प्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार चौघाजणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपास मुन्ना कुडची करीत आहेत.

लाॅजमधून टीव्ही लांबविला

कोल्हापूर : बेकर गल्ली, शाहूपुरी परिसरातील एका लाॅजमध्ये राहण्यास आलेल्या प्रवाशाने रूममधील एलईडी टीव्ही लांबविला. याबाबतची फिर्याद पृथ्वीराज महेंद्र शिंदे (वय २६, रा. रायगड बिल्डिंग, बेकर गल्ली, शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शादब अन्सारी (रा. डी. एल.डी. चावल, भिंडगोरी, मुंबई) या संशयिताविरोधात गुन्हा नोंद झाला.

बेकर गल्ली, शाहूपुरीत रायगड नावाचा लाॅज आहे. येथे १० मार्चला संशयित शादब अन्सारी नावाच्या व्यक्तीने लाॅजमधील १०३ क्रमांकाची खोली आरक्षित केली. तो सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास खोलीमध्ये आला. त्यानंतर त्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या संमतीशिवाय व काऊंटरवर कोणी नसल्याचे पाहून दहा हजार किमतीचा एलईडी टीव्ही लांबविला. याबाबतची फिर्याद गुरुवारी (दि. १८) नोंदविण्यात आली. तपास ठाणे अंमलदार सतीश अतिग्रे करीत आहेत.

कसबा आरळेतून दुचाकी लंपास

कोल्हापूर : कसबा तारळे (ता. करवीर) येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरली. याबाबतची फिर्याद संदीप फिरुलार्जी देशमुख (वय ३५, रा. कसबा आरळे, ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला.

फिर्यादी देशमुख यांनी आपली दुचाकी १ मार्चला रात्री आपल्या घरासमोर दुचाकी उभी केली होती. दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी ती दिसून आली नाही. इतरत्र शोधाशोध केल्यानंतरही ती सापडली नाही. अखेरीस गुरुवारी (दि. १८) करवीर पोलिसांत फिर्याद नोंदविली.

दुचाकीची समोरासमोर धडक : एकजण जखमी

कोल्हापूर : आर.के.नगर ते भारती विद्यापीठ मार्गावर दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जखमी झाले. याबाबतची फिर्याद प्रशांत बाबूराव पाटील (पोलीस हवालदार, करवीर पोलीस) यांनी दिली. त्यानुसार आकाश आनंदा कांबळे (वय ३१, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर) या संशयिताविरोधात गुन्हा नोंद झाला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी (दि.१५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संशयित आर.के.नगर ते भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवीत होता. भारतीय विद्यापीठाकडून चुकीच्या बाजूने येऊन दुचाकीचालक सुहेल बाळासाहेब सावंत यास त्याने गंभीर जखमी केले. यात स्वत: कांबळेही धडकेत जखमी झाला. याबद्दल करवीर पोलिसांतर्फे प्रशांत पाटील यांनी फिर्याद नोंदविली. त्यानुसार संशयित कांबळे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला.

Web Title: In Rajarampur, the old man's hand bag was extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.