राजारामपुरीत उभा राहिले ‘इंद्र’महल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 03:00 PM2017-08-31T15:00:10+5:302017-08-31T15:47:03+5:30

कोल्हापूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध कंपन्याचे ब्रॅण्डेड शोरूमची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या राजारामपुरीतील तरुण मंडळांनी गणेश उत्सवांची जय्यत तयारी केली आहे. दहावी गल्लीतील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने साकरलेले ‘इंद्र’ महल तर राजारामपुरी सहावी गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळाचा द्रोणागिरी पर्वत घेऊन उड्डाण करणारा हनुमान देखावा यंदा वैशिष्टये व आकर्षक  ठरत आहेत. येथील सर्व देखावे आज, शनिवारी पाहण्यासाठी खुले होणार आहेत. 

Rajarampur stood in the 'Indra Mahal' | राजारामपुरीत उभा राहिले ‘इंद्र’महल 

राजारामपुरीत उभा राहिले ‘इंद्र’महल 

googlenewsNext
ठळक मुद्दे आज खुले होणार देखावे नागरिकांची मोठी गर्दी होणारविद्युत रोषणाईसह तांत्रिक, सजीव देखावे

कोल्हापूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध कंपन्याचे ब्रॅण्डेड शोरूमची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या राजारामपुरीतील तरुण मंडळांनी गणेश उत्सवांची जय्यत तयारी केली आहे. दहावी गल्लीतील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने साकरलेले ‘इंद्र’ महल तर राजारामपुरी सहावी गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळाचा द्रोणागिरी पर्वत घेऊन उड्डाण करणारा हनुमान देखावा यंदा वैशिष्टये व आकर्षक  ठरत आहेत. येथील सर्व देखावे आज, शनिवारी पाहण्यासाठी खुले होणार आहेत. 


राजारामपुरीतील पहिल्या ते चौदाव्या गल्ली पर्यंत प्रत्येक मंडळांनी प्राचीन काल्पनिक मंदिरे, गणेश दरबरा, विद्युत रोषणाईसह तांत्रिक व सजीव देखावे साकारल्याने यंदाही देखावे पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याचे चित्र पाहण्यास मिळणार आहेत.

राजारामपुरीतील दहाव्या गल्लीतील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने इंद्रमहल हा काल्पानिक मंडप उभा केला आहे.यामध्ये प्राचिन कालकृतीचे दर्शन घडते. आकर्षक विद्युत रोषणाई आणि मुंबईहून आणलेली ‘श्री’ आकर्षक मुर्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. 


अकरावी गल्लीतील युवक मित्र मंडळाने विमानोड्डाण हा देखावा साकरण्यात आला आहे. या विमानात बसून एका स्क्रिनवर कोल्हापूर दर्शन घडविण्यात येणार आहे.  यासह राजारामपुरतील नवव्या गल्लीतील पद्मराज स्पोर्टस्ने काल्पनिक दरबार साकारला आहे. यासह सहाव्या गल्लीतल जय शिवराय तरुण मंडळाचा द्रोणागिरी पर्वत घेऊन उड्डाण करणारा हा तांत्रिक हनुमानाचा देखावा आहे.

हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर करून हा देखावा तयार केल्याने बालचंमूसाठी हे एक वैशिष्टये आहे. यासह पाचवी गल्लीतील विवेकानंद मित्र मंडळाचा रणझुंझार योध्दा मल्हारी तांडेल तर, हिंदवी स्वराज्य मित्र मंडळाचा सहयाद्रीचा छावा हा सजीव देखावा आहेत. 

राजारामपुरीत कुठे काय पहाल

दुसरी गल्ली : शिवाजी तरुण मंडळ -  काल्पनिक मंदिर (गणेश दरबार)
तिसरी गल्ली:  राजारामपुरी स्पोर्टस् - काल्पनिक मंदिर 
चौथ्थी गल्ली : जय मराठा तरुण मंडळ - शिवलिला 
चौथ्थी गल्ली : जय शिवराय - थर्माकोलचे मंदिर 
पाचवी गल्ली : जय भवानी तरुण मंडळ - अंब्रेला फॉरेस्ट
पाचवी गल्ली : हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ - 

 

 

 

Web Title: Rajarampur stood in the 'Indra Mahal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.