राजारामची निवडणूक येलूर विरुद्ध कोल्हापूरचे सभासद, अशीच आहे - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 10:40 PM2023-03-07T22:40:37+5:302023-03-07T22:41:01+5:30
चोकाक येथे आयोजित राजाराम कारखाना दौरा शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
शिरोली : छत्रपती राजाराम साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणक ही येलूर विरोधात कोल्हापूरच्या सभासदांची आहे. २५ वर्षे महाडिकांच्या ताब्यात असलेला साखर कारखान्यात सत्तांतर घडवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना केले. ते चोकाक येथे आयोजित राजाराम कारखाना दौरा शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले ही निवडणूक महाडिक विरोध बंटी पाटील अशी नसून कारखाना कार्यक्षेत्राच्या बाहेरचे सांगली जिल्ह्यातील येलूर विरुद्ध कोल्हापूरचे सभासद अशीच आहे.
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती आमदार सतेज पाटील यांनी हातकलंगले तालुक्यातील हालोंडी,माले, मुडशिंगी, चोकाक या गावांमध्ये शेतकरी ऊस उत्पादक सभासदांची संवाद साधला साखर कारखान्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.
छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या क्षेत्रातील हातकणंगले मधील आमचं सर्वात जास्त सभासद असलेला गाव या गावात पाणंद,किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही काम झाले नाही. सभासदांना गेले २० वर्ष विचारले नाही, मात्र आता निवडणूक जवळ आल्यापासून दररोज भेटी गाठी साठी सत्ताधारी लोक गावात येत आहेत. मात्र आम्ही यावेळी परिवर्तन केल्या शिवाय स्वात बसणार नसल्याचे मुडशिंगी गावचे जीवनराव शिंदे यांनी सांगितले.
साखर कारखाना मध्ये हुकूमशाही पद्धतीने महाडिक काम करत आहेत व्यापारी म्हणून कोल्हापुरात आले आणि कारखाना ताब्यात घेतला जे सभासद पात्र आहेत ते सांगलीच्या येलूर,तांदुळवाडी मधील आहेत. याचा फायदा घेऊन महाडिक सत्तेवर बसले आहेत. मात्र खरे सभासद या निवडणुकीत परिवर्तन करतील, असा विश्वास माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी सरपंच शशिकांत खवरे,पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत,निलेश पाटील, महेश चव्हाण,सरपंच प्रताप पाटील,डी आर माने प्रशांत शिंदे ,सुनिकेत पाटील, योगेश चोकाकाकर,भाऊसो सुतार,गोपाळ निकम,बाळासाहेब कदम,शरद पवार,सचिन पाटील, दीपक शेटे,वर्धमान बेळके,किरण कांबळे, महावीर पाटील,कृष्णां निकम, बाळासाहेब देशिगे, बाळासाहेब कदम,गाजनन माळी,सचिन कुंभार, जोतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, राजू सुतार, अनिल मोरे यांच्या सह हालोंडी, माले, मुडशिंगी चोकाक या गावचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.