‘राजाराम’चे वीज, पाणी तोडा

By admin | Published: April 19, 2015 01:15 AM2015-04-19T01:15:54+5:302015-04-19T01:15:54+5:30

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कारवाई : इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटनाही बंदचे आदेश

'Rajaram's power, break the water | ‘राजाराम’चे वीज, पाणी तोडा

‘राजाराम’चे वीज, पाणी तोडा

Next

 कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी कसबा बावड्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन बंद करून वीज, पाणी कनेक्शन तोडावे, असा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी शनिवारी काढला. यासह इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सवरही अशीच कारवाई करावी, असाही आदेश आहे.
विभागीय महसूल आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून विचारणा केल्यानंतर हा कारवाईचा आदेश झाला. राजाराम कारखान्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येलाच कारवाईचा आदेश आल्यामुळे खळबळ उडाली. प्रदूषणप्रश्नी येथील महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शिये (ता. करवीर) हद्दीत
५ एप्रिलला पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले. उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणप्रश्नी
२३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यातच मासे मृत झाल्याने प्रदूषण नियंत्रणमंडळ प्रशासनाने गंभीर दखल घेतली. सामाजिक कार्यकर्ते व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या तक्रारीवरून मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, मत्स्य विभागाचे प्रतिनिधी एच. एस. जाधव, महापालिके च्या प्रतिनिधी तेजस्विनी माळी, राजाराम कारखान्याचे प्रतिनिधी नंदकुमार जाधव यांनी राजाराम बंधारा ते शियेपर्यंत नदीपात्राची पाहणी करून पंचनामा केला होता.
राजाराम कारखान्याच्या पश्चिमेच्या बाजूस सुमारे पाचशे मीटरच्या अंतरावर असणाऱ्या उंबरमळी या भागात शेतालगत भूमिगत पाईपलाईनद्वारे सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तेथील दूषित पाण्याचे नमुने घेतले. जलप्रदूषण कायदा १९७४ व हवा प्रदूषण कायदा १९८१ तसेच दूषित पाणी विल्हेवाट अधिनियम २००८ नुसार कारवाईची नोटीस राजाराम कारखाना व्यवस्थापनास बजावली होती. त्याचवेळी बँक हमीची जप्तीही केली होती.
दरम्यान, साखर कारखाना व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कारखान्याचा हंगाम ३० मार्चला संपला आहे. वजनदार राजकीय वरदहस्त असलेल्या या कारखान्याला ‘प्रदूषण’ने दणका दिला. इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्सवरही जलस्रोत व अप्रत्यक्षपणे पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्याप्रकरणीच कारवाईचा आदेश झाला आहे.

Web Title: 'Rajaram's power, break the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.