‘राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स’ बँकेला २ कोटी ३ लाखांचा विक्रमी नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:21+5:302021-04-09T04:25:21+5:30
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट को-ऑपरेटिव्ह बँकेस २०२०-२१ या अर्थिक वर्षात २ कोटी ३ लाख इतका विक्रमी नफा ...
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट को-ऑपरेटिव्ह बँकेस २०२०-२१ या अर्थिक वर्षात २ कोटी ३ लाख इतका विक्रमी नफा झाला असून एनपीए शून्य टक्के केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी दिली.
गेल्या अर्थिक वर्षात बँकेने ठेवीवरील व्याजदरात कपात करूनदेखील ठेवींमध्ये वाढ झाली आहे. यात १८५ कोटी ४६ लाख इतक्या ठेवी आहेत. तर ११६ कोटी ६९ लाख इतकी कर्जे वितरित करण्यात आलेली आहेत. बँकेचा ३०२ कोटी १५ लाख इतका व्यवसाय झाला आहे. सी.डी. रेशो ६२.९२ टक्के इतका आहे. बँकेने कर्जावरील व्याजदर टप्याटप्याने कमी करून तो ९.९० टक्के इतका कमी केले आहे. त्याचा सभासद लाभ घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीची लाट असतानादेखील बँकेने थकबाकी वसुलीमध्ये सातत्य ठेवले होते. त्यामुळे कर्जाची थकबाकी पूर्ण आटोक्यात आली. सलग ११ वर्षे एनपीए शून्य टक्के राखण्यात यश आले आहे. बँकेने राज्यस्तरीय पुरस्कारांसह रिझर्व्ह बँकेचे ग्रेड वन मानांकन प्राप्त केले आहे. मोबाईल बँकिंग सुविधा अल्पावधीत सुरू केली जाणार आहे. बँकेच्या प्रगतीत ग्राहक, सभासद, ठेवीदार, संचालक, हितचिंतकांचा सिंहाचा वाटा असल्याने नावलौकिक वाढत आहे, असेही अध्यक्ष पंदारे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष विलासराव कुरणे, संचालक मधुकर पाटील, शशिकांत तिवले, प्रकाश पाटील, राजेंद्र चव्हाण, भरत पाटील, अतुल जाधव, राजेंद्र पाटील, रमेश घाटगे, संजय सुतार, जयदीप कांबळे, बाळासाहेब घुणकीकर, संचालिका हेमा पाटील, नेहा कापरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे उपस्थित होते.
फोटो : ०८०४२०२१-कोल-रवींद्र पंदारे (अध्यक्ष)