थेरगाव येथील राजर्षी शाहू वाचनालयाचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:52+5:302021-02-07T04:21:52+5:30

सरुड : थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे राजर्षी शाहू साहित्य गौरव ...

Rajarshi Shahu Library Award announced at Thergaon | थेरगाव येथील राजर्षी शाहू वाचनालयाचे पुरस्कार जाहीर

थेरगाव येथील राजर्षी शाहू वाचनालयाचे पुरस्कार जाहीर

googlenewsNext

सरुड : थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये चंद्रशेखर कांबळे (शेणाला गेलेल्या पोरी- कविता), डॉ. श्रीकांत पाटील (लॉकडाऊन- कादंबरी), डॉ. संभाजी बिरांजे (छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र पत्रव्यवहार- वैचारिक व संशोधनात्मक) बाबूराव शिवराम रोकडे (जसं घडलं तसं- आत्मचरित्र) व विश्वास सुतार (तुकाराम नावाचा संत माणूस- चरित्र), प्रा. विष्णू शिंदे (शिवार कथासंग्रह) यांच्या साहित्य कलाकृतींना सन २०२० चा राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवीण महाजन, (पुणे) यांना ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल ग्रंथालयाच्या वतीने राजर्षी शाहू ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत रेडेकर व प्रा. प्रकाश नाईक यांनी दिली आहे.

Web Title: Rajarshi Shahu Library Award announced at Thergaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.