आंतरराष्ट्रीय कर प्रणाली परीक्षेत प्रथम आलेल्या रजत पोवार यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:33+5:302021-02-23T04:35:33+5:30
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कर प्रणाली परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवणारे सी. ए. रजत पोवार यांचा मराठा महासंघ व मराठा ...
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कर प्रणाली परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवणारे सी. ए. रजत पोवार यांचा मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने शाहू छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या परीक्षेस देशभरातून पाच हजारांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून कोल्हापूरचे सी. ए. रजत पोवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीची दखल घेत मराठा महासंघाच्यावतीने शाहू छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाहू छत्रपती यांनी नव्या करप्रणालीची माहिती पोवार यांच्याकडून घेतली. यानिमित्त महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी हे यश कोल्हापूरकरांसाठी अभिमानस्पद आहे, असे मत मांडले. रजत पोवार हे कोल्हापूरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट संभाजीराव पोवार यांचे चिरंजीव आहेत. या सत्कार प्रसंगी मल्हार सेनेचे बबन रानगे, लमाण समाजाचे रामचंद्र पोवार, उदय पाटील, प्रकाश पाटील, दीपिका पोवार, बाबूराव बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : २१०२२०२१-कोल- सत्कार
फोटो ओळी : मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवनच्यावतीने आंतरराष्ट्रीय कर प्रणाली परीक्षेत देशात प्रथम आलेल्या रजत पोवार यांचा शाहू छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वसंतराव मुळीक, बबन रानगे, रामचंद्र पोवार, उदय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.