करप्रणाली परीक्षेत उचगावच्या रजत पोवारची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:09+5:302021-02-08T04:21:09+5:30

उचगाव : उचगाव (ता. करवीर ) येथील ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट संभाजी शंकर पोवार यांचे चिरंजीव युवा ...

Rajat Powar of Uchgaon won in the tax system examination | करप्रणाली परीक्षेत उचगावच्या रजत पोवारची बाजी

करप्रणाली परीक्षेत उचगावच्या रजत पोवारची बाजी

Next

उचगाव : उचगाव (ता. करवीर ) येथील ज्येष्ठ चार्टर्ड अकौंटंट संभाजी शंकर पोवार यांचे चिरंजीव युवा चार्टर्ड अकौंटंट रजत संभाजी पोवार यांनी इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेत (आंतरराष्ट्रीय करप्रणाली) बाजी मारली. त्याने भारतातून पहिला येण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याच्या या यशदायी कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

रजत पोवार हा सेंट झेव्हीअर्स हायस्कूलचा माजी विद्यार्थी असून १० वीच्या परीक्षेत त्याला ९७.८२ टक्के गुण मिळाले होते. २१ व्या वर्षी सी. ए. होण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे.

चौकट:-

माझ्या या यशात माझे वडील चार्टड अकौंटंट संभाजी पोवार यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. सुरुवातीपासूनच गणिताची आवड असल्याने आणि वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चार्टर्ड अकौंटंट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या दृष्टीने प्रयत्न केले. सीएही झालो. नंतर इंटरनॅशनल टॅक्सेशन परीक्षेत घवघवीत यश मिळविले. प्राप्तिकरांची स्थिती आणि आव्हानात्मक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून याच टॅक्सेशनचा जगावर परिणाम कसा होतो. त्याचा अभ्यास या परीक्षेसाठी झाला. आईवडिलांची पुण्याई आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद कामी आले.

- रजत संभाजी पोवार(सीए) ,राजारामपुरी

फोटो : ०७रजत संभाजी पोवार

Web Title: Rajat Powar of Uchgaon won in the tax system examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.