राजे बँकेस ६ कोटी १६ लाखांचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:56+5:302021-06-03T04:17:56+5:30
अध्यक्ष पाटील म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात कोरोना विषाणूच्या महामारीचा परिणाम सर्वच बँकांच्या आर्थिक उलाढालीवर झाला. अशी प्रतिकूल ...
अध्यक्ष पाटील म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात कोरोना विषाणूच्या महामारीचा परिणाम सर्वच बँकांच्या आर्थिक उलाढालीवर झाला. अशी प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थिती असून देखील आमचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक आणि कर्मचारी यांनी चिकाटीने प्रयत्न करून बँकेची यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे.
यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार माळकर व संचालक आप्पासाहेब भोसले, राजेंद्र जाधव, आप्पासाहेब हुच्चे, प्रकाश पाटील, रवींद्र घोरपडे, रणजित पाटील, विशाल पाटील, उमेश सावंत, सौ. कल्पना घाटगे, अनिल मोरे, बाबासाहेब मगदुम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण उपस्थित होते.
चौकट.
● राज्यात दुसरा क्रमांक
एन.पी.ए शून्य टक्के आहे. ५४ कोटी ८० लाखांनी ठेवीची वाढ झाली असून एकूण ठेवी रुपये ३७७ कोटी झाल्या आहेत. कर्जे २१० कोटी, तर एकूण व्यवसाय ५८७ कोटी झाला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये राजे बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ३४५ लाभार्थ्यांना २८ कोटीची कर्जे दिली आहेत, असेही एम. पी. पाटील म्हणाले.