राजे बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:29+5:302021-04-02T04:24:29+5:30
१०३ वी वार्षिक सभा कागल - येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास ...
१०३ वी वार्षिक सभा
कागल
- येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी वित्त पुरवठा करण्यामध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी माहिती बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बँकेच्या103 व्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजे बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.
बँकेकडे ठेवी कर्जवाटप व वसुलीसह ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होण्यासाठी शाखांसह कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा राबविली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक मुख्य कार्यालय द्वितीय क्रमांक सेनापती कापशी, तर तृतीय क्रमांक गडहिंग्लज व मुदाळ तिट्टा यांना शाखांना विभागून देण्यात आला. तर आदर्श कर्मचारी पुरस्कार शिपाई आनंदा काकडे यांना जाहीर केला.
स्वागत अप्पासाहेब भोसले यांनी केले, श्रद्धांजली वाचन अप्पासाहेब हुच्चे यांनी केले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण यांनी नोटीस वाचन केले, तर उपाध्यक्ष नंदकुमार माळकर यांनी आभार मानले. यावेळी संचालक राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील, रवीद्र घोरपडे, रणजित पाटील, विशाल पाटील, उमेश सावंत, कल्पना घाटगे, ॲड. बाबासाहेब मगदूम, अनिल मोरे आदी उपस्थित होते.
चौकट
● दोन कोटी 37 लाख रुपये नफा.
कोरोना परिस्थितीतसुद्धा बँकेच्या ठेवी व नफ्यामध्ये वाढ झाली आहे. नफा २ कोटी ३७ लाख रुपये इतका झाला आहे. तर ठेवींमध्ये सुद्धा 43 कोटींची वाढ होऊन त्या 322 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. एकूण कर्जे 191 कोटी 77 लाख इतके केले असून त्यात थकबाकीचे प्रमाण २.११ टक्के इतके अत्यल्प आहे. असे एम. पी. पाटील यांनी सांगितले.
छायाचित्र
-कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या ऑनलाइन पद्धतीने झालेल्या 103 व्या वार्षिक वार्षिक सभेस अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सर्व संचालक उपस्थित होते.