राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवबंधनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 03:13 PM2020-01-18T15:13:32+5:302020-01-18T15:16:08+5:30
कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. तसेच धनुष्य बाणाची प्रतिमा भेट दिली. यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
कोल्हापूर : कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी सार्वजनिक आरोग्य व वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. तसेच धनुष्य बाणाची प्रतिमा भेट दिली. यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.
शनिवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे श्री अंबाबाई मंदिरात आगमन झाले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हस्ते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हातात शिवबंधन बांधण्यात आले. तसेच त्यांना शिवधनुष्य प्रतिमा भेट देण्यात आली.
यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने, सचिव विजय पोवार, सदस्य राजेंद्र जाधव, शिवाजीराव जाधव उपस्थित होते.
यानंतर उजळाईवाडी विमानतळावरून मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना झाले. यावेळी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश साळोखे, आदी उपस्थित होते.
चांदीची तलवार भेट
मंदिरातून बाहेर पडताना शनि मंदिराजवळ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना चांदीची तलवार भेट देवून त्यांचा सत्कार केला. यावेळील मिलिंद नार्वेकर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.