महायुतीची उमेदवारी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अखेर जाहीर; तिरंगी लढत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:44 PM2024-10-28T23:44:43+5:302024-10-28T23:44:56+5:30

महायुतीतून राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार  राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उमेदवारी सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या कोट्यातून आमदार यड्रावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे .

Rajendra Patil Yadravkar's candidature of Mahayuti finally announced | महायुतीची उमेदवारी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अखेर जाहीर; तिरंगी लढत होणार

महायुतीची उमेदवारी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना अखेर जाहीर; तिरंगी लढत होणार

शिरोळ : महायुतीतून राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उमेदवारी सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या कोट्यातून आमदार यड्रावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे . आमदार यड्रावकर यांनी यापूर्वीच राजर्षी शाहू विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील व स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांच्याशी होणार आहे.

आमदार यड्रावकर तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. गेल्या २०१९  च्या निवडणुकीत शिरोळची जागा महाविकास आघाडीने स्वाभिमानीला सोडल्यामुळे यड्राववकर  अपक्ष निवडणूक लढले होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते. राज्यातील राजकीय भूकंपानंतर  ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहयोगी आमदार म्हणून राहिले.

शिरोळ तालुक्यात मुस्लिम दलित मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फटका बसू नये यासाठी त्यांनी शाहू विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुतीने आपली उमेदवारी फक्त पुरस्कृत करावी, त्याची अधिकृत घोषणा करू नये असे त्त्यांचे प्रयत्न सुरु होते..आपण भाजपसोबत गेलो असल्याचे समजले तर पारंपरिक मतदान मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटत आहे.

Web Title: Rajendra Patil Yadravkar's candidature of Mahayuti finally announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.