राजगे यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला मुकलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:52+5:302021-08-26T04:26:52+5:30

: प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. महाविद्यालयाचा नावलौकिक शिवाजी विद्यापीठ ...

Rajge's demise left a scholarly personality | राजगे यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला मुकलो

राजगे यांच्या निधनाने अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला मुकलो

Next

: प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. महाविद्यालयाचा नावलौकिक शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात उंचावण्यासाठी डॉ. राजगे सर यांनी यशस्वी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालकपदी २०१० ते २०१५ या कालावधीत काम करण्याची संधी मिळाली होती, असे प्रतिपादन शोकसभेत माजी खासदार निवेदिता माने यांनी केले. रुकडी येथे बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

माजी खासदार माने म्हणाल्या, प्राचार्य डॉ. राजगे ग्रामीण भागातून कमवा व शिका योजनेतून शिक्षण पूर्ण करून आलेले असल्यामुळे रुकडीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे हे ओळखून त्यांनी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असून, या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. या संस्थेचा चांगला मार्गदर्शक आपल्यातून निघून गेला, त्यांची पोकळी भरून काढता न येण्यासारखी आहे,

शोकसभेत प्रा.डॉ. लता मोरे, प्रा.डॉ.आरती भोसले, प्रा.डॉ.स्मिता राणे, सौ. उज्ज्वला बुले, सौ.पद्मा पाटील, सौ. आशा राऊत, प्रा.डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांनी भावना व्यक्त केली. शोकसभेस बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शाखांचे पदाधिकारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Rajge's demise left a scholarly personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.