सुट्टी घरातली आणि मनांतली यावर राजीव तांबे साधणार संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 05:39 PM2019-04-27T17:39:50+5:302019-04-27T17:40:07+5:30
दहावीचे सरते वर्ष म्हणजे नव्या करिअरच्या संधीचे नवे क्षितीज. एकीकडे सुटीचा आनंद दुसरीकडे पुढे काय करायचे यावर विचारमंथन. या दुहेरी वळणावर विद्यार्थी व पालकांची नेमकी भूमिका काय असावी?, मुलांची सुट्टी पालक आणि मुलांनाही आनंदी कशी घालवता येईल. मुलांच्या करिअरच्या नव्या वाटा कशा चोखंदळता येईल. यावर ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने मंगळवारी (दि. ३०) ‘युनिसेफ’चे शिक्षण सल्लागार राजीव तांबे यांचे ‘खळबळ व सुजाण पालकत्व’ या विषयावर व्याख्यान होत आहे.
कोल्हापूर : दहावीचे सरते वर्ष म्हणजे नव्या करिअरच्या संधीचे नवे क्षितीज. एकीकडे सुटीचा आनंद दुसरीकडे पुढे काय करायचे यावर विचारमंथन. या दुहेरी वळणावर विद्यार्थी व पालकांची नेमकी भूमिका काय असावी?, मुलांची सुट्टी पालक आणि मुलांनाही आनंदी कशी घालवता येईल. मुलांच्या करिअरच्या नव्या वाटा कशा चोखंदळता येईल. यावर ‘लोकमत बाल विकास मंच’च्या वतीने मंगळवारी (दि. ३०) ‘युनिसेफ’चे शिक्षण सल्लागार राजीव तांबे यांचे ‘खळबळ व सुजाण पालकत्व’ या विषयावर व्याख्यान होत आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी ४.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात तांबे हे मुलांच्या विश्वातील प्रश्न आणि पालक, पालकांनी नेमके काय करावे, या विषयांवर मार्गदर्शन करतील. ज्या कुटुंबातील मुलामुलींनी दहावीची परीक्षा दिली आहे, तेथे यानंतर पुढचे करिअर कशात करणार, मुलांच्या आवडीचा विचार करायचा, की ज्या क्षेत्रात जास्त संधी त्याचा विचार करायचा, असा गोंधळ सुरू असतो. दुसरीकडे मुलांच्या हातात मोबाईल येतो आणि त्यांचे विश्व आभासी जगात गुंतून जाते. मुलांनी सतत मोबाईलवर असणं पालकांना आवडत नाही, अशी द्विधा स्थिती असते. त्यांना या कार्यक्रमात उत्तम मार्गदर्शन होवू शकेल.
या कार्यक्रमाला मोफत प्रवेश आहे; त्यासाठीचे पासेस सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ लक्ष्मीपुरी व ओम सायन्स अकॅडमी, पद्मावती अपार्टमेंट, जैन गल्ली, रविवार पेठ येथे उपलब्ध आहेत. कार्यक्रमाला लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९७६७२६४८८५ व ९५४५७२९५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
राजीव तांबे यांच्याविषयी..
राजीव तांबे हे लेखक, कवी, नाटककार असून, सातत्याने मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यिक आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी देश-विदेशात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या असून, अभिनव शिक्षणपद्धतीवर त्यांचा भर असतो. ‘गंमत शाळा’ ही चळवळ ते राबवितात. त्यांची २२ भाषांतून ९१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.