राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल : यशवंतराव थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 04:37 PM2019-05-21T16:37:08+5:302019-05-21T16:38:58+5:30
राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.
कोल्हापूर : राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.
शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कॉँग्रेसतर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९व्या शहिद दिनानिमित्त अभिवादन मेळाव्याचे आयोजन केले होते. थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा कॉँग्रसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राजीव गांधी यांच्या प्रतिमा पुजनाने मेळाव्याची सुरूवात झाली.
राजीव गांधी यांची उज्वल कारकिर्द आज पुन्हा तरुणाईपुढे मांडण्याची गरज प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. राज्य कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी व प्रकाश सातपुते, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भुपाल शेटे, महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे, शहर अध्यक्षा संध्याताई घोटणे, आदींसह कॉँग्रसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.