राजेखान जमादार : मुरगूडमध्ये पुरस्काराची
By admin | Published: January 15, 2016 11:34 PM2016-01-15T23:34:34+5:302016-01-16T00:51:17+5:30
शेतकरी हितामुळे मंडलिक कारखाना सर्वोत्कृष्ट मिरवणूक; साखरपेढे वाटून आनंदोत्सव
मुरगूड : हमीदवाड्याच्या माळावर नंदनवन फुलविणाऱ्या सदाशिवराव मंडलिक कारखान्याने सुरुवातीपासूनच शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच कार्य केले आहे. पारदर्शक व शेतकऱ्यांच्या हिताच्या कारभारामुळेच सर्व निकष पार करीत हा कारखाना राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना ठरला. ही घटना कागल तालुक्याला अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन बिद्री कारखान्याचे संचालक राजेखान जमादार यांनी केले.
मंडलिक साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या सन्मानचिन्हाची शहरातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. यावेळी संपूर्ण शहरातून फटाक्यांची आतषबाजी करीत साखरपेढे वाटप करण्यात आले.
अंबाबाई मंदिराच्या प्रांगणात राजेखान जमादार यांच्यासह प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, जीवन साळोखे, मारुती ओतारी, आर. डी. पाटील-कुरुकलीकर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी स्वागत केले.
नगरसेवक सुहास खराडे, पांडुरंग भाट, सुखदेव येरुडकर, किरण गवाणकर, कारखान्याचे संचालक नारायण मुसळे, सर्जेराव पाटील, केशव पाटील, संजय सुतार, अमर सणगर, भगवान लोकरे, दत्ता मंडलिक, सुभाष बारदेस्कर, रघुनाथ सूर्यवंशी, दत्ता रावण, श्रीकांत गोंधळी, सम्राट मसवेकर, प्रकाश हळदकर, सचिन भारमल, संजय चौगले, अरुण ढोले, महादेव वंदुरे, दीपक शिंदे, आण्णासोा थोरवत, बाबाजी डोंगरे, राजेंद्र गोरुले, अजित कापसे उपस्थित होते. सुहास खराडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)