कोरोना काळातही रजपूतवाडीची विकासकामात आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:44+5:302021-07-03T04:15:44+5:30
प्रतिपादन गोकूळचे संचालक एस. आर. पाटील यांनी केले. रजपूतवाडी ता. करवीर येथील गोसावी वसाहतीमध्ये कॉंक्रीट रस्ता, गटारी, संरक्षण ...
प्रतिपादन गोकूळचे संचालक एस. आर. पाटील यांनी केले.
रजपूतवाडी ता. करवीर येथील गोसावी वसाहतीमध्ये कॉंक्रीट रस्ता, गटारी, संरक्षण भिंत बांधकामकामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. सरपंच रामसिंग रजपूत यांनी विकासकामासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी निधी दिल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी उपसरपंच प्रवीण कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नामदेव पाटील, सतीश कुरणे, शिवाजी पाटील, गजाननसिंग रजपूत, प्रसाद रजपूत, तानाजी गोसावी, दारासिंग रजपूत, परशराम गोसावी, सर्जेराव धनवडे, ग्रामसेविका अश्विनी पाटील उपस्थित होते.
फोटो : ०२ रजपूतवाडी विकासकाम
ओळी- रजपूतवाडी, ता. करवीर येथे रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभ करताना एस.आर. पाटील. यावेळी चंद्रकांत पाटील, सरपंच-रामसिंग रजपूत, प्रवीण कांबळे, राजेंद्र कोळी, नामदेव पाटील, अश्विनी पाटील उपस्थित होते.