हातकणंगलेच्या विकासासाठी राजू आवळे प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:07+5:302021-06-27T04:17:07+5:30
खोची/नवेपारगाव : हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राजू आवळे यांनी गतिमान प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विविध विकासकामांचा धडाका लावून ...
खोची/नवेपारगाव : हातकणंगले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राजू आवळे यांनी गतिमान प्रयत्न सुरू ठेवले आहेत. विविध विकासकामांचा धडाका लावून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. हातकणंगले तालुक्यातील विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांनी केले.
वाठार(ता.हातकणंगले)येथे आमदार राजू आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन व गरजू लोकांना धान्य वाटप मंत्री राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजू आवळे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री राजेंद्र पाटील(यड्रावकर) म्हणाले, ‘‘वाठार गावच्या आरोग्य उपकेंद्रासाठी निधी दिला जाईल. गावच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीतही महाविकास आघाडी सरकारने विकास विकासकामांच्या बाबतीत अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. निधीसाठी अडचणी आल्या; परंतु आरोग्यसेवेसाठी लागणाऱ्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रक्रम दिला. विशेष म्हणजे लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला आहे.’’
आमदार राजू आवळे म्हणाले, ‘‘वाठार गावाने नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. या गावच्या विकासासाठी भरगोस निधी दिला जाईल. वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. मंत्री राजेंद्र पाटील यांचे हातकणंगले तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य लाभले आहे. यापुढे त्यांच्या सहकार्यातून विकासाची अनेक कामे मार्गी लावली जातील.
यावेळी बी.एस.पाटील, चिमाजी दबडे, जावेद कुरणे, महेश जगताप,सुरेश नरके यांची भाषणे झाली. प्रारंभी सकाळी वृक्षारोपण तसेच कोरोना योद्धा यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास चेतन चव्हाण, सचिन चव्हाण, संजय नांदणे, अफसर पटेल, आनंदा शिंदे,राजहंस भुजींगे, मोहसिन पोवाळे, विनायक पाटील, स्वरूप शिंदे, प्रतीक शिंगे, शरद कांबळे, नानासो मस्के, बाबासो पटाईत, सुहास पाटील, विलास मस्के, सागर कांबळे, सुरेखा मस्के,नाजुका भुजिंगे, सारिका शिंदे, जानव्ही शिंदे, बी. एस. पाटील, महिताप पटाईत उपस्थित होते.
२६ वाठार आवळे बर्थ डे
फोटो ओळी-वाठार येथे काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त आमदार राजू आवळे यांचा सत्कार मंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर)यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नानासो मस्के, संजय नांदणे, चेतन चव्हाण, कपिल पाटील, जावेद कुरणे, महेश जगताप, राजहंस भुजिंगे उपस्थित होते.