Raju Shetti: आजपर्यंत कुणालाही विकलो नाही म्हणून; राजू शेट्टींना लोकवर्गणीतून फॉर्च्युनर गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:02 PM2022-06-14T13:02:37+5:302022-06-14T13:05:07+5:30

एखादा ऊस उत्पादक शेतकरी असला तरी त्याचा रुबाब अनेकदा वागण्या, बोलण्यात आणि वावरण्यात दिसून येतो.

Raju Shetti : So far no one was able to buy raju shetty, which is not strange. fortuner car from the crowd fund by farmer to Raju Shetty | Raju Shetti: आजपर्यंत कुणालाही विकलो नाही म्हणून; राजू शेट्टींना लोकवर्गणीतून फॉर्च्युनर गिफ्ट

Raju Shetti: आजपर्यंत कुणालाही विकलो नाही म्हणून; राजू शेट्टींना लोकवर्गणीतून फॉर्च्युनर गिफ्ट

googlenewsNext

कोल्हापूर - राजकीय नेतेमंडळीने गाडी घेणे आता नवीन किंवा काही वेगळं राहिलं नाही. कारण, सध्या आमदार-खासदारांकडे फॉर्च्युनेर कार सहज पाहायला मिळतात. मात्र, शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी घेतलेली गाडी चर्चेचा विषय ठरली आहे. राजू शेट्टी यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून गाडीसंदर्भात माहिती दिली. तसेच, या गाडीची पूजा करताना व्हिडिओही त्यांनी फेसबुकवरुन शेअर केला आहे. 

एखादा ऊस उत्पादक शेतकरी असला तरी त्याचा रुबाब अनेकदा वागण्या, बोलण्यात आणि वावरण्यात दिसून येतो. त्यात, कोल्हापुरी माणूस म्हटलं की लय भारी असतो. मात्र, ऊस उत्पादक शेकऱ्यांचे नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या राजू शेट्टींना आता फिरायला हक्काची गाडी मिळाली आहे. कारण, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चळवळीतील लोकांनी, शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून राजू शेट्टींसाठी शानदार कार खरेदी केली आहे. याबाबत, राजू शेट्टींनी फेसबुक पोस्ट शेअर करत कोल्हापूर-सांगलीकरांचे आभार मानले आहेत. 

धन्यवाद सांगली-कोल्हापूरकर. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिलं आहे, त्याचा मी कृतज्ञपुर्वक स्वीकार करतो, असे राजू शेट्टींनी म्हटले आहे. राजू शेट्टींनी गिफ्ट करण्यात आलेली टोयोटाची ही कार तब्बल 40 लाख रुपये किमतीची आहे. मात्र, सध्याच्या काळात आपल्या नेत्यासाठी लोकांनी वर्गणी गोळा करून पैसे द्यावेत हीच बाब फार मोठी आहे. म्हणूनच 40 लाख रुपयांची ही कार राजू शेट्टी यांच्यासाठी नक्कीच अनमोल आहे, तिची किंमत पैशात होऊच शकणार नाही.
 

Web Title: Raju Shetti : So far no one was able to buy raju shetty, which is not strange. fortuner car from the crowd fund by farmer to Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.