शिवाजी पूलप्रश्नी आता खासदार एकजूट करणार पंतप्रधानांकडे लवकरच पाठपुरावा : राजू शेट्टींचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:57 AM2018-05-09T00:57:45+5:302018-05-09T00:57:45+5:30

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्णातील खासदारांकडून दिल्लीदरबारी पुन्हा पाठपुरावा होणार आहे.

 Raju Shetti's initiative: Shivaji pull-out now to co-chair the MPs soon | शिवाजी पूलप्रश्नी आता खासदार एकजूट करणार पंतप्रधानांकडे लवकरच पाठपुरावा : राजू शेट्टींचा पुढाकार

शिवाजी पूलप्रश्नी आता खासदार एकजूट करणार पंतप्रधानांकडे लवकरच पाठपुरावा : राजू शेट्टींचा पुढाकार

Next

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्यासाठी जिल्ह्णातील खासदारांकडून दिल्लीदरबारी पुन्हा पाठपुरावा होणार आहे. शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी खासदार राजू शेट्टी यांनी दर्शवली. खासदार धनंजय महाडिक यांनी जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने सोमवारी (दि. ७) कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. जिल्ह्णातील खासदारांबाबतही नाराजी व्यक्त करीत ‘त्यांनी आतापर्यंत काय केले?’ अशी विचारणा केली.
या खासदारांनी थेट राष्टÑपतींची भेट घेऊन शिवाजी पूलप्रश्नी वटहुकुम काढण्याबाबत विनंती करावी, अशी मागणीही यावेळी झाली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने खासदार शेट्टी, संभाजीराजे व महाडिक यांना या प्रश्र्नाच्या सोडवणूकीसाठी तुम्ही काय करणार आहात अशी विचारणा नव्याने केली.

खा शेट्टी म्हणाले,‘ पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी यापूर्वी अनेक वेळा केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मनावर घेऊन हे काम पूर्ण करण्याची गरज आहे. हा प्रश्न कोल्हापूरच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कॅबिनेटच्या माध्यमातून पुलाच्या परवानगीसाठी राष्टÑपतींकडे प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्णातील खासदारांना घेवून लवकरच पंतप्रधानांची भेट घेऊ’


खासदार महाडिक म्हणाले, ‘ पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला असून, अजूनही तो सुरू आहे. राष्टÑपतींच्या अधिकारात वटहुकुम निघण्यासाठी गेल्या महिन्यातच पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राष्टÑपतींना अहवाल पाठवावा, अशी मागणी केली आहे. जून महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात पुलाच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न निकाली निघेल, अशी खात्री आहे. कृती समितीने थोडे संयमाने घ्यावे. जनतेची गैरसोय व त्रास होईल असे आंदोलन करू नये.’


खासदार संभाजीराजे म्हणाले,‘ खासदार झाल्यानंतर प्रथमच दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेऊन शिवाजी पूलप्रश्नी गांभीर्य सांगून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर प्रधान सचिव मिश्रा यांनाही भेटून पाठपुुरावा केला होता. आपल्या प्रयत्नांमुळेच इतिहासात प्रथमच ‘पुरातत्त्व’चा कायदा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कृती समितीने खासदारांवर अविश्वास दाखवू नये. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांना पत्र देऊन राष्टÑपतींनी वटहुकुम काढण्याबाबत कॅबिनेटतर्फे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली आहे.’

Web Title:  Raju Shetti's initiative: Shivaji pull-out now to co-chair the MPs soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.