७८ विद्यार्थ्यांसाठी राजू शेट्टींनी घेतली कुलगुरुंची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:58 AM2019-02-27T10:58:26+5:302019-02-27T10:59:49+5:30

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उजळाईवाडीची मान्यता रद्द केल्याने ७८ विद्यार्थ्यांचा निकाल शिवाजी विद्यापीठाने रोखला आहे. या विद्यार्थ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली. हा विषय न्यायप्रविष्ट आहे, तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी दिली.

Raju Shetti's visit to 78 students was done by the Vice Chancellor | ७८ विद्यार्थ्यांसाठी राजू शेट्टींनी घेतली कुलगुरुंची भेट

७८ विद्यार्थ्यांसाठी राजू शेट्टींनी घेतली कुलगुरुंची भेट

Next
ठळक मुद्दे७८ विद्यार्थ्यांसाठी राजू शेट्टींनी घेतली कुलगुरुंची भेटसर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय मान्यतेचा प्रश्न

कोल्हापूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उजळाईवाडीची मान्यता रद्द केल्याने ७८ विद्यार्थ्यांचा निकाल शिवाजी विद्यापीठाने रोखला आहे. या विद्यार्थ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली. हा विषय न्यायप्रविष्ट आहे, तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी दिली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून तीन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालयाची मान्यता रद्द केली. तरीही संस्थेने अभ्यासक्रम पूर्ण केला, विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आणि निकालही तयार झाला. पण विद्यापीठाने मान्यता रद्द केल्याचे कारण पुढे करीत ७८ विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला. संस्थेने उच्च न्यायालयात दाद मागितली, पण येथे विद्यापीठाच्या बाजूने निकाल लागला आणि मान्यता रद्दचा निर्णय कायम राहिला.

याबाबत, मंगळवारी खासदार राजू शेट्टी यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची कैफियत मांडली. महाविद्यालयात काही त्रुटी होत्या, तर प्रवेशाच्या लिस्टमध्ये तुम्ही नाव का दिले? विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शैक्षणिक वर्ष पूर्ण करून परीक्षा देईपर्यंत विद्यापीठाने हस्तक्षेप का केला नाही? अशी विचारणा शेट्टी यांनी केली. तुमच्या डोळेझाकपणामुळे ७८ विद्यार्थ्यांच्या भविष्यात अंधार पसरला आहे, त्याला जबाबदार कोण? संबंधितांचे निकाल तत्काळ द्या, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

यावर संबंधित वाद हा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत महाविद्यालयीन सलग्नता तपासणी समितीपुढे प्रस्ताव ठेवतो. त्यानंतर न्यायालयात निकाल दाखल करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी दिली. यावेळी प्राचार्य व्ही. एम. पाटील, सुरेश पाटील, किरण भोसले यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
 
७८ विद्यार्थ्यांसाठी राजू शेट्टींनी घेतली कुलगुरुंची भेट

सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय मान्यतेचा प्रश्न :

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालय, उजळाईवाडीची मान्यता रद्द केल्याने ७८ विद्यार्थ्यांचा निकाल शिवाजी विद्यापीठाने रोखला आहे. या विद्यार्थ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली. हा विषय न्यायप्रविष्ट आहे, तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी दिली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून तीन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठाने महाविद्यालयाची मान्यता रद्द केली. तरीही संस्थेने अभ्यासक्रम पूर्ण केला, विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आणि निकालही तयार झाला. पण विद्यापीठाने मान्यता रद्द केल्याचे कारण पुढे करीत ७८ विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरला. संस्थेने उच्च न्यायालयात दाद मागितली, पण येथे विद्यापीठाच्या बाजूने निकाल लागला आणि मान्यता रद्दचा निर्णय कायम राहिला.
याबाबत, मंगळवारी खासदार राजू शेट्टी यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांची कैफियत मांडली. महाविद्यालयात काही त्रुटी होत्या, तर प्रवेशाच्या लिस्टमध्ये तुम्ही नाव का दिले? विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शैक्षणिक वर्ष पूर्ण करून परीक्षा देईपर्यंत विद्यापीठाने हस्तक्षेप का केला नाही? अशी विचारणा शेट्टी यांनी केली. तुमच्या डोळेझाकपणामुळे ७८ विद्यार्थ्यांच्या भविष्यात अंधार पसरला आहे, त्याला जबाबदार कोण? संबंधितांचे निकाल तत्काळ द्या, अशी मागणी शेट्टी यांनी केली. यावर संबंधित वाद हा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत महाविद्यालयीन सलग्नता तपासणी समितीपुढे प्रस्ताव ठेवतो. त्यानंतर न्यायालयात निकाल दाखल करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी दिली. यावेळी प्राचार्य व्ही. एम. पाटील, सुरेश पाटील, किरण भोसले यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
------------------------------------
(राजाराम लोंढे)

Web Title: Raju Shetti's visit to 78 students was done by the Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.