हातकणंगलेत राजू शेट्टीविरुध्द राजू शेट्टी..मतदारांचा गोंधळ उडेल आणि
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:50 PM2019-04-06T16:50:58+5:302019-04-06T16:56:10+5:30
निवडणूकीत प्रतिस्पर्ध्याला चकवा देण्यासाठी नानाविध क्लृप्त्या शोधून काढल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे बलाढ्य उमेदवाराचे नाम साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीलाच रिंगणात उतरवणे. एकदा का बॅलेटवर नाव आले की
कोल्हापूर: निवडणूकीत प्रतिस्पर्ध्याला चकवा देण्यासाठी नानाविध क्लृप्त्या शोधून काढल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे बलाढ्य उमेदवाराचे नाम साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीलाच रिंगणात उतरवणे. एकदा का बॅलेटवर नाव आले की मतदारांचा गोंधळ उडेल आणि मतविभागणी होईल अशी त्यामागील धारणा असते. यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीतही हा प्रयोग हातकणंगले मतदारसंघात करण्यात आला आहे. स्वाभिमानीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात मुंबईस्थित राजू मुजीक शेट्टी यांना उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे नाम साधर्म्यापलीकडे त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मतविभागणीसाठी ही खेळी खेळली गेली असलीतरी या निवडणूकीत प्रथमच नाव, चिन्हाबरोबरच उमेदवाराचा फोटोही दिसणार असल्याने ही शक्कल फारशी उपयोगी पडणार नाही.