महाविकास आघाडी म्हणून मागे फरफटत जाणार नाही- राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 05:17 AM2021-03-14T05:17:47+5:302021-03-14T05:18:33+5:30
कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात ‘गोकूळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी, असे काही जण समजत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, ‘गोकूळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. (Raju Shetty Commented on Mahavikas aghadi)
कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात ‘गोकूळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना विचारले असता, राज्यात सत्तेवर येताना अनेक पक्षांची मिळून महाविकास आघाडी आकारास आली. मात्र, सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हेच महाविकास आघाडीत आहेत. इतर छोट्या पक्षांना ते गृहीत धरत नाहीत, असे शेट्टी म्हणाले.
वीज बिल माफीसाठी शुक्रवारी महामार्ग रोको आंदोलन -
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी १९ मार्च रोजी राज्यभर महामार्ग रोको करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.