एफआरपी वाढल्याशिवाय ऊस घालण्याची गडबड नको :राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:06 AM2018-10-15T00:06:28+5:302018-10-15T00:06:46+5:30
कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून ...
कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एफआरपी दर वाढवून मिळाल्याशिवाय कारखान्याकडे ऊस घालण्याची गडबड करू नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी येथे केले.
१७ व्या ऊस परिषदेच्या तयारीसाठी कोडोली (ता. पन्हाळा) येथे अंबाबाई मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रविवारी दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या २०० रुपयांची एफआरपी फसवी असून, यामुळे शेतकºयांचा फायदा होणार नसून यापेक्षा साखर कारखानदारांनाच फायदा होणार आहे. सरकार शेतकºयांना फसवीत असून, ते आम्ही कदापि सहन करणार नाही. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार
आहे. यावेळी दत्ता भोसले, विक्रम पाटील, आदींनी मनोगत व्यक्तकेले.
एफआरपीचा फायदा कारखानदारांना
सध्या बहुतांशी साखर कारखानदार सध्याच्या भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने एफआरपीचा फायदा शेतकºयांना न होता तो कारखानदारांना कसा होईल याचा विचार केला आहे. तसेच ज्या साखर कारखानदाराने एफआरपी दिली नाही त्याच कारखानदारांसमवेत ऊस परिषद होत आहे, हे खेदजनक आहे, असेही शेट्टी म्हणाले.