Maharashtra Vidhan Sabha 2019:सांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:24 PM2019-09-28T12:24:30+5:302019-09-28T12:27:05+5:30

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे.

Raju Shetty urges him to fight Sangol | Maharashtra Vidhan Sabha 2019:सांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रह

Maharashtra Vidhan Sabha 2019:सांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रह

Next
ठळक मुद्देसांगोल्यातून लढण्याचा राजू शेट्टी यांना आग्रहगणपतराव देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट

कोल्हापूर : सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या तोडीचा वारसदार कोण, याचा शोध सुरू झाला आहे. हा शोध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यापर्यंत येऊन थांबला आहे. आजच्या परिस्थितीत शेट्टी हेच गणपतरावांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवू शकतात, असा मतप्रवाह ‘शेकाप’च्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांनी शेट्टी यांची भेट घेऊन सांगोल्यातून लढावे, असा आग्रह धरला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून १९६२ पासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून गेली ५५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. याला अपवाद फक्त १९७२ आणि १९९५ ची निवडणूक राहिली. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा पराभूत झाले; पण लगेच पोटनिवडणूक लागल्याने ते पुन्हा विजयी झाले.

१९९५ मध्ये युतीच्या लाटेत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते. या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता गणपतराव देशमुख यांनी ५५ वर्षे आमदार म्हणून राहण्याचा जागतिक विक्रमच आपल्या नावावर केला. ‘गिनीज बुक’मधील विक्रमापेक्षा जनतेच्या मनावर तब्बल साडेपाच दशके अधिराज्य गाजविण्याचा विक्रम करणारे गणपतराव आता ९४ वर्षांचे आहेत.

कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी प्रकृती साथ देत नसल्याने नव्या दमाच्या व्यक्तीकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी, असे सांगून त्यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. विनंत्या करूनही त्यांनी निर्णय न बदलल्याने अखेर नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.

गणपतरावांचा वारसदार हादेखील त्यांच्याप्रमाणेच विचारांशी, चळवळीशी आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधीलकी मानणाराच असावा, असे निकष ठरविण्यात आले. विशेष म्हणजे मतदारसंघाला डाग लागू द्यायचा नाही, ही एकमेव धारणा घेऊन शोध सुरू झाला. त्यांच्या या प्राथमिक निकषांत शेतकरी चळवळीतून पुढे आलेले राजू शेट्टी बसत असल्याने कार्यकर्त्यांनी शिरोळला येऊन त्यांच्याकडे तसा आग्रह धरला आहे.

शेतकऱ्यांची चळवळ कमकुवत होणे ही आजच्या घडीला धोक्याची घंटा असल्याने ती सुरू राहायची असल्यास शेट्टींना बळ मिळणे गरजेचे आहे. शेतकरी आणि दुष्काळी समाजाचा आवाज विधानसभेत गणपतरावांप्रमाणेच ताकदीने पोहोचविण्याची धमक आजच्या घडीला शेट्टी यांच्याव्यतिरिक्त कुणाकडे नाही, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. यातूनच त्यांनी आग्रह धरला आहे; पण शेट्टी यांनी अजून होकार दर्शविलेला नाही.
 

 

Web Title: Raju Shetty urges him to fight Sangol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.