मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूर शहरात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 06:01 PM2019-01-25T18:01:18+5:302019-01-25T18:01:38+5:30

तुमचे मत तुमचा अधिकार, एक मत एक मूल्य, मतदार असल्याचा अभिमान बाळगा, अशा विविध घोषणांनी शुक्रवारी शहरातील मार्ग दुमदुमले. मतदार जनजागृतीपर रॅलीत सहभागी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह ‘एनसीसी’ व ‘एनएसएस’च्या छात्रांनी मतदानाविषयी जनजागृती केली.

Rally in Kolhapur city for voter awareness | मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूर शहरात रॅली

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शुक्रवारी शहरातून काढण्यात आलेल्या मतदार जनजागृती रॅलीचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देमतदार जनजागृतीसाठी कोल्हापूर शहरात रॅली

कोल्हापूर : तुमचे मत तुमचा अधिकार, एक मत एक मूल्य, मतदार असल्याचा अभिमान बाळगा, अशा विविध घोषणांनी शुक्रवारी शहरातील मार्ग दुमदुमले. मतदार जनजागृतीपर रॅलीत सहभागी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह ‘एनसीसी’ व ‘एनएसएस’च्या छात्रांनी मतदानाविषयी जनजागृती केली.

रॅलीची सुरुवात बिंदू चौक येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भरतनाट्यम् नृत्यांगना संयोगिता पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, महापालिका उपायुक्त मंगेश शिंदे, करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी उपस्थित होते.

 सुरुवातीस मतदार जनजागृतीपर पथनाटय सादर करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींची रॅली बिंदू चौक-शिवाजी पुतळा-महानगरपालिका-दसरा चौक या मार्गावरून परत शाहू स्मारक भवन येथे आली. मतदार जनजागृती रॅलीतून मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, अशा घोषणा शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींसह एन.सी. सी. आणि एनएसएसच्या छात्रांनी दिल्या.

 

 

Web Title: Rally in Kolhapur city for voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.