कृतज्ञता म्हणून ‘रामकृष्ण’ जलाशय नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:23+5:302021-07-08T04:17:23+5:30
या प्रकल्पाचा दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या काही मंडळींच्या पुढाकाराने काहीजण प्रकल्पाचे काम थांबावे म्हणून कोर्टात गेले आहेत. मात्र, प्रकल्पात पाणीसाठा ...
या प्रकल्पाचा दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या काही मंडळींच्या पुढाकाराने काहीजण प्रकल्पाचे काम थांबावे म्हणून कोर्टात गेले आहेत. मात्र, प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने या मंडळींना पोटशूळ सुटला आहे. शिवाय धरणाला विरोधाच्या निमित्ताने चालणारी दुकानदारीही आता बंद होण्याची भीती या मंडळींच्या मनात आहे.
आमच्या मात्र जमिनी गेल्या आहेत. परंतु, उर्वरित आणि भागातील पिण्याच्या आणि जमिनीच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असल्याने आम्हाला आनंद झाला आहे. आमच्या ज्या बांधवांचे पुनर्वसन अद्याप रेंगाळले आहे. त्यात भाऊबंदकी, कागदपत्रांची अपूर्णता व अन्य कारणे असून त्यांचाही प्रश्न सुटण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्री मुश्रीफ दरमहा आढावा बैठक घेत असून लवकरच हा प्रश्नही मार्गी लागेल याची आम्हाला खात्री आहे.
निवेदनावर, वडकशिवाले येथील शिवाजी पाटील, रघुनाथ पाटील, गणपती लोखंडे, राजेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.