रामभक्तांचा रथावर पाना-फुलांचा वर्षाव

By admin | Published: November 23, 2014 10:22 PM2014-11-23T22:22:19+5:302014-11-23T23:51:35+5:30

फलटणचा रथोत्सव : दर्शनासाठी भाविकांच्या ठिकठिकाणी रांगा

Rambaktas get rid of the chariot-floral rain | रामभक्तांचा रथावर पाना-फुलांचा वर्षाव

रामभक्तांचा रथावर पाना-फुलांचा वर्षाव

Next

फलटण : शहर व तालुक्यातील भाविकांचे आराध्य दैवत श्री प्रभू रामचंद्र यांचा रथोत्सव गेल्या साडेतीन शतकांपासून सुरू असलेल्या परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहर व तालुक्यातील रामभक्तांनी रथावर पाना-फुलांचा वर्षाव केला. दरम्यान, रथातील राम-सीतामाईच्या दर्शनासाठी भाविकांनी ठिकठिकाणी रांगा लावल्या होत्या.
रथोत्सवानिमित्त आज सकाळी येथील श्रीरामाच्या मंदिरासमोर पानाफुलांनी, नारळाच्या तोरणांनी सजविलेल्या आकर्षक ट्रॅक्टर-ट्रॉलीत राम आणि सीतामाईच्या मूर्ती बसविण्यात आल्या. त्यानंतर नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांनी रामरथाची पूजा केली. यावेळी देवस्थान ट्रस्टी, मानकरी उपस्थित होते. अभिषेक व पूजा झाल्यानंतर रामरथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाला.
श्रीराममंदिर, शिंपी गल्ली, शिवशक्ती चौक, उघडा मारुती मंदिर, बारामती चौक, पंचायत समिती, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, जैन स्तंभ, ज्ञानेश्वर महाराज मंदिर, महात्मा फुले चौक, मारवाड पेठ, बाणगंगा नदीपात्र, मलठण उंबरेश्वर चौक, सद्गुरू हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौक, रविवार तालीम, उमाजी नाईक चौक, गजानन चौक येथून जबरेश्वर मंदिरमार्गे रामरथ श्रीराममंदिराजवळ सायंकाळी उशिरा पोहोचला.
दरम्यान, रथमार्गावर ठिकठिकाणी रामभक्तांनी रथाचे दर्शन घेतले. ग्रामीण भागातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. चौकाचौकात स्वागत कमानी, सडा-रांगोळीने रथाचे स्वागत करण्यात आले. नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा सारिका जाधव यांच्या हस्ते रामरथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवकांनी रथाचे दर्शन घेतले. पालिकेच्या वतीने भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Rambaktas get rid of the chariot-floral rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.