आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:02+5:302020-12-07T04:18:02+5:30
प्रतिकूलतेवर मात करीत रमेश कांबळे यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांचे वडील कै. श्रावण कांबळे हे धडाडीचे ...
प्रतिकूलतेवर मात करीत रमेश कांबळे यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांचे वडील कै. श्रावण कांबळे हे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा वारसा रमेश यांनी जपला आहे. १९९० साली मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा महाराष्ट्रभर सुरू असताना त्यांनी त्यात उडी घेतली. या लढ्यात अनेक मोर्चे, धरणे, रास्ता रोको व गावबंद यासारख्या आंदोलनांत भाग घेतला.
सामाजिक क्षेत्रात काम सुरू असताना रमेश यांनी राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. सन १९९९ पासून ते कार्यरत झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत इचलकरंजी पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सदस्यपद त्यांना मिळाले. मात्र, या शिक्षण मंडळाच्या सभापतिपदाला ते पात्र असतानाही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे ५० वर्षांची कॉँग्रेसची सत्ता असणाऱ्या शिक्षण मंडळात परिवर्तन घडविले व सत्तापालट केला. अर्थातच त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऑगस्ट २०१६ ला ते सभापती पदावर आरूढ झाले. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात शिक्षण मंडळात भाजपची सत्ता रमेश कांबळे यांच्यामुळे आली होती. हक्क मागून मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्व घेऊन रमेश यांनी आपल्या वाटचालीस सुरुवात केली. शिक्षण मंडळ सभापतिपदावर असताना शैक्षणिक सुधारणा व शिक्षक, तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी भर दिला. आंबेडकरनगर परिसरात सिद्धार्थ गौतमबुद्ध यांची मूर्ती बसविण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच अनेक गरीब विद्यार्थ्यांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले मोफत काढून दिले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा....
शब्दांकन
कृष्णात पोवार