लमाण्याच्या घरामध्ये यशाचा ‘किरण’-यूपीएससी’मध्ये धवल यश : शिंगणापूर, चंदगडसह विजापुरातही आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:19 AM2018-04-29T01:19:49+5:302018-04-29T01:19:49+5:30
‘कोल्हापूर : जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत किरण चव्हाण याने ७७९व्या रँकने धवल यश मिळवत लमाण्याच्या घरामध्ये यशाचा ‘किरण’ प्रज्वलित केला आह.
‘कोल्हापूर : जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत किरण चव्हाण याने ७७९व्या रँकने धवल यश मिळवत लमाण्याच्या घरामध्ये यशाचा ‘किरण’ प्रज्वलित केला आह.
विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील देवहिप्परगी या दुष्काळी परिसरातील चव्हाण कुटुंब २५ वर्षांपूर्वी पोटासाठी कोल्हापुरात आले. वर्षानुवर्षे प्रशस्त रस्त्याची कामे करणारे लमाणी समाजातील हे कुटुंब शिंगणापूरला स्थायिक झाले. तिथेच किरणचं पहिली ते सहावी शिक्षण झालं. पुढील शिक्षणासाठी बहीण कमल आणि भावोजी रवी राठोड यांनी त्याला आपल्याकडे कोकणात पणदूर येथे नेले. दहावीपर्यंत किरणचे शिक्षण कुडाळच्या शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. तोपर्यंत किरणचा मोठा भाऊ शिवराज हा चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथे रस्त्याची कामे घेत तेथेच स्थायिक झाला. त्याने किरणला आपल्याकडे बोलावून घेतले आणि चंदगडच्या न. भु. पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथून किरण बारावी शास्त्र परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढे त्याने आॅल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरियल एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१५ साली मेकॅनिकलची पदवी घेतली आहे.
सकारात्मक दृष्टिकोनातून यश : अजय कुंभार
कोल्हापूर : आयुष्यातील सकारात्मक दृष्टिकोनामुळेच मी यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया ‘यूपीएससी’त यशस्वी झालेल्या किसरूळ (ता. पन्हाळा) येथील अजय गणपती कुंभार यांनी व्यक्त केली.
अजय कुंभार यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पाटपन्हाळा येथे, तर माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये व महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद महाविद्यालयात झाले, तर वालचंद महाविद्यालयातून मॅकेनिकलमधून पदवी घेतली. यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथे २०१५ पासून ‘यूपीएससी’ची तयारी केली. दररोज आठ ते दहा तास अभ्यासाचे नियोजन केले होते.
वडील गणपती, आई शोभा या प्राथमिक शिक्षक आहेत. भाऊ अक्षय हा ‘केआयटी’ महाविद्यालयात शिकत आहे.