तरुणावरील तलवारीचा वार रणरागिणीने झेलला अंगावर

By admin | Published: February 17, 2017 10:45 PM2017-02-17T22:45:36+5:302017-02-17T22:45:36+5:30

शाहूनगरमधील घटना : होस्टेलमधील विद्यार्थ्याचा वाचविला जीव; घटनेचा थरार सोशल मीडियावर व्हायरल; चार तरुणांना पोलिसांकडून अटक

Ranaragani caught by the sword of the youth was caught by the victim | तरुणावरील तलवारीचा वार रणरागिणीने झेलला अंगावर

तरुणावरील तलवारीचा वार रणरागिणीने झेलला अंगावर

Next

 सातारा : होस्टेलवर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारण्यासाठी आलेल्या युवकांच्या टोळक्याच्या तलवारीचा वार एका रणरागिणीने अंगावर झेलला. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याचा जीव वाचला. हा सगळा थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
शाहूनगर गोडोली येथे राजयोग होस्टेल आहे. या होस्टेलवर वैभव मालपाणी (वय १९, रा. जालना) हा राहतो. १४ फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास चार युवक या होस्टेलवर आले. त्यातील एकाच्या हातात तलवार होती. होस्टेलमधील खोलीमध्ये घुसून आतून दरवाजा लावून वैभवला त्यांनी बेदम मारहाण केली. ही वादावादी सुरू असल्याची माहिती होस्टेलचे व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या शारदा जाधव यांना समजली. त्यानंतर त्यांनी तत्काळ वैभवच्या खोलीकडे धाव घेतली. तोपर्यंत वैभवला त्यांनी प्रचंड मारहाण केली होती. जाधव यांनी त्या युवकांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित मुले वैभवच्या अंगावर धावून जात होती. त्यातील एका मुलाने तर सोबत आणलेली तलवार वैभवच्या अंगावर उगारली. त्याचवेळी शारदा जाधव यांनी त्या मुलाचा हात धरला. जाधव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वैभवचा जीव वाचविला. त्याची ढाल बनून त्या दरवाजाजवळ मुले जाईपर्यंत उभ्या राहिल्या. त्या मुलाच्या हातात तलवार असल्यामुळे मदतीला कोणी धावून आले नाही.
रात्रगस्त घालणाऱ्या पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तत्काळ तेथे पोहोचले. वैभववर हल्ला करणारे ऋतिक शिंदे, आशिष कांबळे, ऋषभ जाधव, सुयोग कदम (रा. गोडोली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सगळ्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून वैभववर हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैभवने तक्रार दिल्यानंतर चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)


तलवार घेऊन खुलेआम फिरणाऱ्या युवकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा कोणी अशाप्रकारचा विचारही करणार नाही.
- शारदा जाधव, होस्टेल व्यवस्थापक
तलवार घेऊन खुलेआम फिरणाऱ्या युवकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा कोणी अशाप्रकारचा विचारही करणार नाही.
- शारदा जाधव, होस्टेल व्यवस्थापक


संबंधित चार मुलांची वैद्यकीय तपासणी करून रितसर अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तलवारही जप्त केली असून ही सर्व मुले जामिनावर सुटली आहेत.
- के.एम. फरांदे, तपास अधिकारी

Web Title: Ranaragani caught by the sword of the youth was caught by the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.