मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी रणरागिणी सज्ज

By admin | Published: October 15, 2016 12:50 AM2016-10-15T00:50:28+5:302016-10-15T00:50:28+5:30

मराठा क्रांती मोर्चा : मनोगत, निवेदन, प्रतिमापूजन, पुष्पहार अर्पण युवती करणार

Ranaragini ready to lead the rally | मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी रणरागिणी सज्ज

मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी रणरागिणी सज्ज

Next

कोल्हापूर : मराठा क्रांती मूक मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी रणरागिणी सज्ज झाल्या आहेत. सकल मराठा समाजातर्फे आज, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाच्या विविध न्याय्य हक्क मागण्यांसाठी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाचे संपूर्ण नेतृत्व युवती करणार आहेत.
शिवाजी पेठेतील गांधी मैदानातून सकाळी अकरा वाजता मोर्चास सुरुवात होईल. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनानंतर मोर्चास प्रारंभ होईल.
मोर्चामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बिंदू चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्यांना, दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी पुतळा या पुतळ्यांनाही युवतींच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले जाणार आहे. आरती देवाळे, प्राजक्ता बागल, अंकिता मोरे, शिल्पा फडतारे, ऋतुजा पाटील या युवती राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील; तर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सोनाली सूर्यवंशी, प्राजक्ता पाटील, प्रणिता कदम, सिद्धी भोसले या पुष्पहार अर्पण करतील.
बिंदू चौकातील महामानवांच्या पुतळ्यांना (राजर्षी शाहू महाराज), ऋतुजा राजेंद्र पाटील, गायत्री अशोक राऊत; तर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) अनघा प्रदीप देसाई, स्नेहा नेताजी (महात्मा जोतिबा फुले) राजेश्वरी रणजित जाधव, प्रीतल गुरुनाथ पाटील; तर दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास स्नेहल दुर्गुळे-इनामदार, शिवानी जाधव, तेजस्विनी संजय पांचाळ, प्रज्ञा प्रदीप जाधव, सई कुंडलिक पाटील, सुप्रिया युवराज दळवी, साक्षी सागर पन्हाळकर यांचा पुष्पहार अर्पण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास शिवानी शिंदे, राधिका कोरणे, वैष्णवी शिंदे, प्राजक्ता देसाई, पूजा सर्वेश एकशिंगे या पुष्पहार अर्पण करणार आहेत. ताराराणी चौकातील छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणाऱ्यांमध्ये वनिता पाटील, प्रियांका पाटील, सोनम पाटील, ऋतुजा उत्तम मोरे यांचा समावेश आहे.

Web Title: Ranaragini ready to lead the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.