रंकाळ्यासमोरचा रस्ता रखडला; चक्क पार्किंगचा अड्डा बनला !

By admin | Published: February 6, 2015 11:29 PM2015-02-06T23:29:34+5:302015-02-07T00:10:13+5:30

‘आयआरबी’कडून अद्याप २५ कोटींपेक्षा अधिकची प्रलंबित कामे करण्याबाबत ‘आयआरबी’ला पत्रव्यवहार केला चार वर्षांतील डीएसआरमध्ये फरक असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान

Randalla road ahead; Became a parking lot! | रंकाळ्यासमोरचा रस्ता रखडला; चक्क पार्किंगचा अड्डा बनला !

रंकाळ्यासमोरचा रस्ता रखडला; चक्क पार्किंगचा अड्डा बनला !

Next

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील निकृष्ट व गेल्या चार वर्षांपासून रखडलेला रंकाळा चौपाटीसमोरील ‘डी मार्ट’च्या दारातील रस्ता वाहनधारकांची मोठी डोकेदुखी बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथे एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने वाहनांची कोंडी नित्याची बनली आहे; तर बंद रस्त्याचा फायदा घेत येथे झालेल्या मॉलने रस्त्यावरच चक्क पार्किंगची सोय केली आहे. याकडे महापालिका प्रशासन मात्र सोपस्कारपणे दुर्लक्ष करत आहे.शहरातून तळकोकणात जाणारा मुख्य वाहतुकीचा मार्ग म्हणून या रस्त्यास मोठे महत्त्व आहे. सतत वर्दळीचा असणारा हा रस्ता मात्र सुविधेच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. हा रस्ता गेली चार वर्षे खचलेलाच आहे. तसेच रस्त्याबाबत स्थानिक मिळकतधारकांचा वाद आहे. त्यामुळे चौपाटीपासून रंकाळा टॉवरकडे येणारा रस्ता बंद करत एकेरी मार्ग करून महापालिका प्रशासन मोकळे झाले आहे. हा रस्ता करण्याची जबाबदारी ‘आयआरबी’ची आहे. मात्र, सततची आंदोलने व काम करण्याचा निरूत्साह यामुळे ‘आयआरबी’ने शहरातील सर्वच प्रलंबित कामे थांबविली आहेत. हा रस्ताही महापालिका व आयआरबी यांच्या वादात अडकला आहे.दर शनिवारी व रविवारी किंवा सुट्यांदिवशी पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत याठिकाणी वाहनांची प्रचंड कोंडी होते. शिवाय मार्गावरील दोन्ही बाजूंचे गटारींचे कामही अपूर्ण आहे. काही ठिकाणी तर गटारी पूर्णपणे उघडी आहेत. पादचारी, दुचाकीस्वार या गटारींमध्ये पडून छोटे-मोठे अपघात होत आहेत.

खचलेला रस्ता ‘जैसे थे’
पुढील बाजूस पेट्रोलपंपाजवळही काही महिन्यांपूर्वी रस्ता खचला आहे. त्याची दुरुस्ती न करता त्याला बॅरेकेटिंग लावून वाहतूक सुरू आहे.

‘आयआरबी’कडून अद्याप २५ कोटींपेक्षा अधिकची कामे प्रलंबित आहेत. ही कामे करण्याबाबत ‘आयआरबी’ला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या चार वर्षांतील डीएसआरमध्ये फरक पडत असल्याने महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. लवकरच रंकाळा चौपाटीसह वाहतुकीस अडथळा असणाऱ्या मार्गावरील सर्वच कामे करण्याचा प्रशासन विचार करत आहे.
- नेत्रदीप सरनोबत
शहर अभियंता

Web Title: Randalla road ahead; Became a parking lot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.