कळंबा परिसरात रंगपंचमी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:11+5:302021-04-03T04:20:11+5:30
कळंबा : कळंबा व लगतच्या सुर्वे नगर, राजलक्ष्मी नगर, साळोखे नगर, तपोवन, संभाजी नगर, रंकाळा तलाव, सानेगुरुजी वसाहत, आपटे ...
कळंबा : कळंबा व लगतच्या सुर्वे नगर, राजलक्ष्मी नगर, साळोखे नगर, तपोवन, संभाजी नगर, रंकाळा तलाव, सानेगुरुजी वसाहत, आपटे नगर, शासकीय मध्यवर्ती कारागृह, कणेरकर नगर, रिंग रोड, जीवबानाना पार्क प्रभागात व उपनगरात रंगपंचमी उत्साहात पण साधेपणाने साजरी करण्यात आली. यावर्षी चौकाचौकात रंगाने भरलेल्या काहिली डॉल्बीचा,वाद्यांचा ठणठणाट, रेनडान्स, दुचाकीवरून भन्नाट वेगात रंग लावत फिरणारे युवक-युवती पाहावयास मिळाले नाहीत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रंग खेळणाऱ्याची संख्या यंदा कमीच होती. अपार्टमेंट पार्किंग, मोकळ्या अंगणात, मोकळ्या जागेत शाळकरी मुले व युवकांनी रंगपंचमी साजरी केली. त्यामुळे मुख्य चौक रिकामे होते. पाण्याचा अपव्यय टाळत केमिकल रंगांचा कमी व पर्यावरणपूरक रंगांचा जास्त वापर करत कोरडी रंगपंचमी साजरी करण्याकडे भर देण्यात आला होता.