रणजितसिंह डिस्ले नवोपक्रमाच्या ध्यासातूनच जगासमोर आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:31 AM2020-12-30T04:31:53+5:302020-12-30T04:31:53+5:30
तुरंबे शिक्षकांनी नवोपक्रमाच्या माध्यमातून आपली ओळख जपली पाहिजे. ग्लोबल शिक्षक रणजितसिंह डिस्ले यांनी ‘क्यु आर’ कोडची ओळख व ...
तुरंबे शिक्षकांनी नवोपक्रमाच्या माध्यमातून आपली ओळख जपली पाहिजे. ग्लोबल शिक्षक रणजितसिंह डिस्ले यांनी ‘क्यु आर’ कोडची ओळख व महत्त्व शिक्षण प्रक्रियेत आणले. या उपक्रमातून ते जगाच्या पटलावर आले. म्हणजे नवोपक्रम आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतात. यासाठी शिक्षकांनी नवोपक्रम करावेत, असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक सातापा शेरवाडे यांनी केले.
विद्यामंदिर ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे प्राथमिक व माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी आर. एल. तळेकर होते.
यावेळी शेरवाडे म्हणाले, नवोपक्रम किंवा कृती संशोधन हे नवीन दिशा देतात. शिक्षण प्रक्रिया रोज बदलत आहे. आपले ज्ञान नेहमी अद्यावत ठेवले पाहिजे. जेवढे शिक्षक अपडेट राहतील तितके विद्यार्थी सक्षम होतील.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक दीपक पोवार, शिवाजी बारड, प्रदीप पाटील, मृणाली भस्मे यानी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी तुरंबे केन्द्रातील एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या मुख्याध्यापक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस. के. पाटील, आर. आर. पाटील, डी. डी. चौगले, मधुकर हिंगे, श्रीकांत मोरे, धनाजी जाधव, सेवक शेटगे, अशोक पाटील, सुकुमार कांबळे, एकनाथ संकपाळ, शशिकुमार पाटील, दत्तात्रय जाधव उपस्थित होते. संजय जितकर यानी आभार मानले
फोटो ओळी
आठवी शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत २१ विद्यार्थी पात्र झाल्याबद्दल मारुतीराव वारके (आबाजी) विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के.पाटील व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला