रणजितसिंह पाटील यांचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:02+5:302021-05-06T04:25:02+5:30
यावेळी ते पुढे म्हणाले, माझ्या विजयात आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान मोलाचे ठरले. कोरोनासारखी महामारी असताना आपण ...
यावेळी ते पुढे म्हणाले, माझ्या विजयात आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान मोलाचे ठरले. कोरोनासारखी महामारी असताना आपण सर्वांनी अपार कष्ट घेतले. हे व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत. जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या गाई- म्हशी गोठ्यातील कष्टकरी हाताला आर्थिक उन्नती लाभण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील दूध उत्पादक घटकातला श्रमजीवी घटक असलेला दूध उत्पादक शेतकरी याचे जीवनमान उंचावण्याची संधी या विजयाने मिळाली आहे. सहकार काय असतं कसं चालविलं जातं याचा अभ्यास असलेल्या रणजितदादा गोकुळमध्ये गौरवशाली काम करतील, असा अशावाद व्यक्त केला. रणधुमाळीत काम केलेल्या सर्वांचे आभार त्यांनी मानले. यावेळी रणजितसिंह पाटील यांचे जंगी स्वागत, मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी गुलाल, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी विश्वनाथ कुंभार, बापूसो आरडे, मधुआपा देसाई, बाळकाका देसाई, सुनील कांबळे, के. ना. पाटील, आर. व्ही. देसाई, विठ्ठलराव कांबळे, दत्तात्रय पाटील, संग्राम देसाई, संतोष मेंगाणे, बाळ जाधव विकास पाटील, विजय गुरव, आदींसह युवक कार्यकर्ते उपास्थित होते.
फोटो -
‘गोकुळ’चे नूतन संचालक रणजितसिंह पाटील यांचे मुदाळ गावात जंगी स्वागत केले.