रंकाळा परिसर सायलेंट झोन करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:59+5:302021-02-05T07:16:59+5:30

कोल्हापूर : महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधावीत, चौकाचौकांतील आयलॅन्ड विकसित करावीत, पर्यटकांसाठी पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावीत, रस्त्याच्या कडेला कमी ...

Rankala area should be made a silent zone | रंकाळा परिसर सायलेंट झोन करावा

रंकाळा परिसर सायलेंट झोन करावा

Next

कोल्हापूर : महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधावीत, चौकाचौकांतील आयलॅन्ड विकसित करावीत, पर्यटकांसाठी पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावीत, रस्त्याच्या कडेला कमी उंचीची झाडे लावावीत, रंकाळा परिसर सायलेंट झोन करावा, अशा विविध सूचना गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत शहरातील मान्यवरांनी केल्या.

महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी यावर्षीचे बजेट शहरवासीयांचे बजेट असावे यासाठी नागरिकांकडून व शहरातील विविध असोसिएशनना दि. ३१ जानेवारीपर्यंत सूचना अथवा संकल्पना लेखी देण्याबाबत आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी बलकवडे यांनी विविध असोसिएशनच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी क्रिडाई, आर्किटेक्ट, बार असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स, आय.टी.आय. असोसिएशन, सी. ए. असोसिएशन, मेडिकल असोसिएशन व इतर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

-बैठकीत झालेल्या सूचना -

- डी. पी. रस्ते व वाहतूक व्यवस्थापनेची अत्यावश्यकता.

- ड्रेनेज लाईनला हाऊस कनेक्शन जोडणे आवश्यक.

- नवीन पाणी, ड्रेनेज लाईन्स टाकताना रस्त्याच्या बाजूस सर्व्हिस चेंबर्स बांधावीत,

- हेरिटेज वास्तू उठून दिसण्यासाठी होर्डिंग्ज व अन्य बोर्ड काढण्यात यावेत.

- औद्योगिक वसाहतीमध्ये पायभूत सुविधा मिळाव्यात.

- उद्यमनगरातील इलेक्ट्रिक वायरिंग अंडरग्राऊंड करावेत.

- घरफाळ्याचे असेसमेंट ऑनलाईन करण्यात यावे.

- ट्रक टर्मिनल्स तातडीने सुरू करावे.

- महापालिका मार्केटसमध्ये सुधारणा कराव्यात.

- पर्यावरणाच्या अनुषंगाने सोलर वापरास प्रोत्साहन द्यावे.

- पर्यटन वाढीच्या अनुषंगाने महापालिकेच्या एका विभागावर जबाबदारी द्यावी.

- आय. टी. पार्क विकसित करण्यात यावे.

- इलेक्ट्रिक बसेस व सोलर पाॅवर प्रकल्प राबवावेत.

- स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्यात यावे.

- कोल्हापूर दर्शन बस सुरू करण्यात यावी.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रंजित शहा, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, उपाध्यक्ष विजय चोपदार, बार असोसिएशनच्या ॲड. शिल्पा सुतार, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम सुर्वे, विश्वजीत देसाई, मेडिकल असोसिएशनच्या डॉ. गीता पिल्लई, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद मोने, प्रदीप व्हरांबळे, चेतन ओसवाल, रविकिशोर माने, हॉटेल असोसिएशनचे नागेशकर, सिद्धांत लाटकर, बार असोसिएशनचे सदस्य सर्वेश राणे, गिरीष आरेकर, सी. ए. असोसिएशनचे उपाध्यक्ष तुषार लाटकर, ए. एम. पी सॉफ्ट आयटी प्रा. लि.चे ए. एम. पाटील, क्रेएशन मीडियाचे विक्रांत जाधव, ॲड. सवना हारळे उपस्थित होते.

फोटो देत आहे.

Web Title: Rankala area should be made a silent zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.