रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

By admin | Published: June 15, 2015 12:41 AM2015-06-15T00:41:04+5:302015-06-15T00:42:09+5:30

पहिल्या टप्प्यात खण स्वच्छ : विकासाआड राजकारण नको : पालकमंत्री

Ranking 'purification' | रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

रंकाळ्याचे ‘शुद्धि’करण

Next

कोल्हापूर : रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रक्रियेचे तंत्र यशस्वी झाल्यास, या प्र्रकल्पाला आर्थिक चणचण भासणार नाही. जिल्ह्यात बुद्धिवाद्यांची कमी नाही, त्यांनी अशा प्रकल्पांची संकल्पना घेऊन पुढे यावे. प्रकल्पांच्या आड राजकारण येऊन त्यांचे मातेरे होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रकार्याच्या उद्घाटनप्रसंगी दिली. यावेळी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (मुंबई) कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, प्रक्रियेचे तंत्र विकसित करणारे प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध पंडित, आयुक्त पी. शिवशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोल्हापूरचे चित्र पालटण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी दर तीन महिन्यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांची बैठक घेणार आहोत. शहराच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी आवाहन करून आर्थिकदृष्ट्याही पाठबळ देणार आहोत. कोल्हापूरकरांच्या मनात या तंत्राने यशस्विता सिद्ध केली तर या प्रकल्पासाठी लागणारा पैसा उभा राहण्यास अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. रसायन विज्ञान संस्थेची माहिती देताना कुलगुरू डॉ. जी. डी. यादव म्हणाले, ही संस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची आहे. संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव सिद्ध केले आहे. संस्थेची गुणवत्ता आय.आय.टी.पेक्षा चांगली असून, तिच्याकडे ३१० पेटंटस् आहेत. संस्थेचे नाणे खणखणीत असून, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त प्रक्रिया तंत्रही आपली उपयोगीता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्राध्यापक डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी प्रकल्पाची तांत्रिक बाबींची माहिती दिली. आरती ड्रग्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील यांनी या प्रकल्पासाठी २५ लाख रुपयांची मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे चिटणीस प्रसाद मंत्री यांनी स्वागत केले. प्राध्यापक अमर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रसायन तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दादांचा कानमंत्र
दररोज भेटणाऱ्या लोकांपैकी ९० टक्के लोक हे बदली व बढतीच्या कामासाठीच भेटतात. बदली व बढतीच्या मागे लागलेले लोक शासकीय सेवेच्या माध्यमातून जनहिताची कामे कशी करणार? बदली व बढतीचा विचार न करता अधिकाऱ्यांनी कामांकडे अधिक लक्ष देणे योग्य राहील. तसेच महापालिके चा प्रशासकीय कामांचा बोजवारा उडाला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी याकडे जातीनिशी लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.

Web Title: Ranking 'purification'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.