Kolhapur: आंतरजातीय विवाह केला, बहिष्कार मागे घेण्यासाठी मागितली खंडणी; नंदीवाले समाजाच्या चौघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 05:00 PM2024-02-15T17:00:18+5:302024-02-15T17:01:34+5:30

हातकणंगले : दलित समाजातील मुलीशी लग्न केल्याने नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या हातकणंगले येथील जोडप्याला पुन्हा समाजात घेण्यासाठी ५० हजार ...

Ransom demanded to withdraw boycott against inter-caste married couple, Crime against four members of Nandiwale community in kolhapur | Kolhapur: आंतरजातीय विवाह केला, बहिष्कार मागे घेण्यासाठी मागितली खंडणी; नंदीवाले समाजाच्या चौघांविरुद्ध गुन्हा

Kolhapur: आंतरजातीय विवाह केला, बहिष्कार मागे घेण्यासाठी मागितली खंडणी; नंदीवाले समाजाच्या चौघांविरुद्ध गुन्हा

हातकणंगले : दलित समाजातील मुलीशी लग्न केल्याने नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या हातकणंगले येथील जोडप्याला पुन्हा समाजात घेण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी जातपंचायतीचा म्होरक्या लक्ष्मण राजाराम जाधव, त्यांचा मुलगा महादेव, दोघे रा.ढवळी, ता. वाळवा, जि.सांगली, लक्ष्मण नंदीवाले, रा. दानोळी, ता. शिरोळ, पांडुरंग नंदीवाले, रा.मंगोबा मंदिर कोथळी, ता.शिरोळ, या चौघांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध निवारण अधिनियम कायद्यान्वये हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची वर्दी संजय संभाजी नंदीवाले, रा. शाहूनगर हातकणंगले यांनी दिली आहे.
           
या गुन्ह्याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, संजय नंदीवाले यांचा चुलत भाऊ सुनील वसंत नंदीवाले याने नृसिंहवाडी येथे १३ / ११ / २०२१ रोजी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांची पत्नी दलित समाजातील असल्याने नंदीवाले समाजाचा प्रमुख लक्ष्मण जाधव याने आपला मुलगा महादेव तसेच लक्ष्मण नंदीवाले (दानोळी ) पांडुरंग नंदीवाले ( कोथळी ) यांच्या मदतीने जात पंचायत भरवून सुनील आणि त्यांच्या कुटुंबाला लग्न झाल्यापासून गेली तीन वर्षे समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यास बहिष्कृत केले होते. संजय नंदीवाले याने जात पंचायतीच्या म्होरक्यासह सर्वांची भेठगाठ घेऊन चुलत भाऊ सुनील यांच्या कुटुंबावर घातलेला समाजाचा बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती केली होती.          
 
जातपंचायतीच्या वरील चार प्रमुखांनी सुनील आणि त्यांच्या कुटुंबावरील समाजाचा बहिष्कार मागे घेण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. संजय नंदीवाले याने वरील चौघांविरुद्ध हातकणंगले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Ransom demanded to withdraw boycott against inter-caste married couple, Crime against four members of Nandiwale community in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.