संजय घोडावत यांच्याकडे मागितली पाच कोटींची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:28+5:302021-06-30T04:15:28+5:30

हातकणंगले : कर चुकवेगिरीचे दोन नंबरचे व्यवसाय बाहेर काढण्याची धमकी देत उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच ...

Ransom of Rs 5 crore demanded from Sanjay Ghodawata | संजय घोडावत यांच्याकडे मागितली पाच कोटींची खंडणी

संजय घोडावत यांच्याकडे मागितली पाच कोटींची खंडणी

Next

हातकणंगले : कर चुकवेगिरीचे दोन नंबरचे व्यवसाय बाहेर काढण्याची धमकी देत उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पी. व्ही. सिंग (रा. दिल्ली) व रमेश ठक्कर (रा. मुंबई) या दोघांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रमेश ठक्कर याला एक लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ठक्कर याला इचलकरंजी न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी संजय दानचद घोडावत (वय ५६, रा. यशवंत हॉसिंग सोसायटी, जयसिंंगपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

संजय घोडावत ग्रुपने कर चुकविले आहेत. त्यामुळे याप्रकरणी धाड टाकून दोन नंबरचे धंदे बाहेर काढणार, तसे नको असेल तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा घोडावत कुटुंबाला जिवे मारू, अशी धमकी पी. व्ही. सिंग व रमेश ठक्कर यांनी संजय घोडावत यांना फोन व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दिली होती. यावरून संजय घोडावत यांनी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली होती. त्यानुसार हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी पथक करून मुंबईला रवाना केले होते. या पथकाने रमेशकुमार प्रतापजी ठक्कर याला एक लाख रुपयाची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले.

Web Title: Ransom of Rs 5 crore demanded from Sanjay Ghodawata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.