kolhapur: हातकणंगले लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी, हसन मुश्रीफांनी सुचवले 'यांचे' नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 04:16 PM2023-05-30T16:16:16+5:302023-05-30T16:23:53+5:30

हा मतदार संघ महाविकास आघाडीत कोणाच्या वाटेला जातो हे निश्चित नसले तरी, राष्ट्रवादीकडून हातकणंगलेसाठी हे एकमेव नाव पुढे आले

Ranveer Singh Gaikwad name recommended for Hatkanangale Lok Sabha, scrutiny by NCP begins | kolhapur: हातकणंगले लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी, हसन मुश्रीफांनी सुचवले 'यांचे' नाव

kolhapur: हातकणंगले लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी, हसन मुश्रीफांनी सुचवले 'यांचे' नाव

googlenewsNext

आर डी पाटील

बांबवडे (कोल्हापूर): हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव  पुढे आले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणी व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत गायकवाड यांच्या नावाबाबत चर्चा झाली. हा मतदार संघ महाविकास आघाडीत कोणाच्या वाटेला जातो हे निश्चित नसले तरी, राष्ट्रवादीकडून हातकणंगलेसाठी हे एकमेव नाव पुढे आले आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीची व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातून माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के पी पाटील, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते .यामध्ये हातकणंगले मतदारसंघासाठी रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव हसन मुश्रीफ यांनी सुचवले आहे.

सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीची मोट चांगल्या पद्धतीने बांधल्यास, विद्यमान खासदारांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. शाहूवाडी- पन्हाळ्यातून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच संयुक्त गायकवाड गट मोठे मताधिक्य देऊ शकतात. हातकणंगलेतून आमदार राजू बाबा आवळे, शिरोळमधून ठाकरे गटाचे उल्हास पाटील, यांची ताकद मिळू शकते, तसेच इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाची, काँग्रेसची मदत बऱ्यापैकी होऊ शकते. वाळव्यातून स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे मोठे मताधिक्य देऊ शकतात.

रणवीर गायकवाड यांच्या मागे मोठा राजकीय वारसा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकाहून अधिक काळ  स्वतःचा दबदबा निर्माण करणारे आजोबा, माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड हे पाच वेळा खासदार व तीन वेळा आमदार राहिले आहेत. तसेच मंत्री पदही भूषवले होते. त्यामुळे त्यांना मारणारा अजूनही जुना वर्ग असून याचा फायदा होऊ शकतो. वडिल जिल्हा बँकेचे संचालक तसेच उपाध्यक्ष होते. त्याचबरोबर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर आई शैलेजादेवी जिल्हा परिषदेत दोन वेळ सदस्य म्हणून होत्या. त्यापैकी एक वेळ त्यांनी महिला व बालकल्याण सभापतीचा चांगला कार्यकाळ पूर्ण केला आहे.

 राजकीय वारशा बरोबरच जिल्ह्यातील नेत्यासह त्यांचे चांगले संबंध, राज्यातील नेत्यांच्या बरोबरही आहेत. त्याचा फायदा ते लोकांची कामे करण्यासाठी करतात .तरुणापासून अबाल वृद्धांना सामावून घेऊन सर्वांच्या बरोबर जाणारा एक युवक अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे जर लोकसभेसाठी यांचे नाव निश्चित झाले तर विद्यमान खासदारांच्या पुढे ते मोठे आव्हान देऊ शकतील.

Web Title: Ranveer Singh Gaikwad name recommended for Hatkanangale Lok Sabha, scrutiny by NCP begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.